कोल्हापूर

महापालिकेला शिक्षकांच्या बदल्यांचा मुहूर्त सापडेना

CD

महापालिकेला शिक्षकांच्या बदल्यांचा मुहूर्त सापडेना
दीड वर्ष उलटले, तरी प्रशासनाकडून प्रक्रिया नाही; पदोन्नतीही रखडल्या

संतोष मिठारी ःसकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : दीड वर्षे उलटले, तरी प्राथमिक शिक्षण समितीकडील शाळांमधील शिक्षकांच्या बदली आणि पदोन्नती करण्यासाठी महापालिकेला मुहूर्त सापडलेला नाही. गेल्या शैक्षणिक वर्षात बदलीची प्रक्रिया झाली नसल्याने या शाळा आणि शिक्षकांना अडचणींना तोंड द्यावे लागले होते. यंदा पुन्हा तीच परिस्थिती होऊ नये यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने शाळा सुरू होण्यापूर्वी बदली, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रशासनाने जुलै २०२२ मध्ये प्राथमिक शिक्षण समितीकडील शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविली होती. गेल्यावर्षी जूनमध्ये प्रशासनाच्या पातळीवर चालढकल आणि वेळेत निर्णय घेतले नसल्याने बदल्यांची प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे शाळांना आवश्यकतेप्रमाणे शिक्षक मिळाले नाहीत. पदोन्नतीसाठीही मुख्याध्यापक, पर्यवेक्षकांना वर्षभर वाट पाहावी लागली. विज्ञान विषय शिक्षक भरावेत यासाठी शिक्षक संघटनांकडून सातत्याने दोन वर्षे विनंती करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. एकाच शाळेत सात वर्षे काम केलेल्या शिक्षकांची बदली करण्याचा ठराव प्राथमिक शिक्षण समितीने केला आहे. आता सुमारे ५० शिक्षकांना एकाच शाळेत आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. सभागृहाचा ठराव असूनही प्रशासन या शिक्षकांच्या बदल्या का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या संचमान्यतेनुसार चार मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यात मराठी माध्यमातील तीन आणि ऊर्दू माध्यमातील एका पदाचा समावेश आहे. शैक्षणिक पर्यवेक्षकांचे एक पदही रिक्त आहे. ही रिक्त पदे त्वरित भरावीत. अनेक वर्षांपासून शैक्षणिक पर्यवेक्षक एकाच क्षेत्रा (बीट) मध्ये कार्यरत असून, त्यांचीही खांदेपालट व्हावी, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. मात्र, मे महिना संपला तरी महापालिका प्रशासनाकडून यादृष्टीने ठोस पाऊल उचलेले दिसत नाही.
....
चौकट
तरीही विलंब का?
इतर विभागांचे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असतानाही बदलीचे काम करीत होते. पण, शैक्षणिक पर्यवेक्षक, लिपिकीय वर्ग कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रत्यक्ष काम नसतानाही त्यांच्या टेबलची कामे करण्यात विलंब का होत आहे, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
.....
चौकट
बदल्यांपूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया व्हावी
महापालिका शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. बदल्यांच्या धोरणामध्ये प्रशासन काही बदल करू इच्छित असल्यास संघटनांना विश्वासात घेऊन शासन नियमानुसार बदली धोरण आखण्यात यावे. बदल्या होण्यापूर्वी शैक्षणिक पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, विषय शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबवावी. जे विषय शिक्षक रिव्‍हर्शन (पदावनत) घेऊ इच्छितात त्यांना संधी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत आणि सरचिटणीस संजय कडगांवे यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन प्रशासकांना दिले आहे.
....
ग्राफ करावा
दृष्टिक्षेपात...
महापालिकेच्या शाळा : ५८
मराठी माध्यमाचे शिक्षक : ३२१
ऊर्दू माध्यमाचे शिक्षक : २०
....
कोट
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्याचे नियोजन आहे.
-एस. के. यादव, प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : उजनी धरणातून भीमा नदीत ३५०० क्युसेक ने विसर्ग सुरू

भारतीय संघात स्थान मिळत नाही म्हणून, कुलदीप यादवने निवडली दुसरी वाट! आता 'या' परदेशी संघासाठी खेळणार पाच वन डे सामने

Loni Kalbhor Accident: भरधाव ट्रकने धडक दिल्याने ७२ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT