कोल्हापूर

शिवराज्याभिषेक दिनी मर्दानी कलेची मानवंदना

CD

शिवराज्याभिषेकदिनी
मर्दानी कलेची मानवंदना
मराठा महासंघातर्फे साउंड सिस्टीमविरहित मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : मराठा महासंघातर्फे ३५० व्या शिवराज्याभिषेकदिनी (ता. ६) होणाऱ्या राज्याभिषेक मिरवणुकीमध्ये मिरजकर तिकटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना जिल्ह्यातील मर्दानी खेळ आखाड्यांतर्फे मर्दानी कलेची मानवंदना देण्यात येणार आहे. या माध्यमातून साउंड सिस्टीमला फाटा देऊन मराठमोळी संस्कृती जपण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याने नेहमीच राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. याचाच एक भाग म्हणून मिरवणुकींना नवी दिशा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मर्दानी आखाड्यांनी पुढाकार घेतला आहे. शिवराज्याभिषेकदिनी होणारी छत्रपती शिवरायांची मिरवणूक पारंपरिक, शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक मराठमोळी संस्कृती जपणारी असणार आहे. या मिरवणुकीत मर्दानी आखाड्यांच्या वतीने सर्व खेळाडू छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणार आहेत. या मिरवणुकीत साउंड सिस्टीमशिवाय हे कार्यकर्ते तरुण, नागरिक मिरवणुकीत सहभागी होतात, हे दाखवून देणार आहेत. तरी सर्व मर्दानी खेळाच्या आखाड्यांनी ६ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ येथे एकत्र जमावे, असे आवाहन मराठा महासंघ व मर्दानी खेळाच्या आखाडा प्रमुखांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: ‘शिवसेना’ कुणाची? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी शिंदेंचा मोठा दावा; नेत्यांना दिल्या खास सूचना, राजकारणात खळबळ!

Agriculture Admission: कृषी प्रवेशाची पहिली यादी जाहीर! तुमचे नाव आहे का? १०,९७६ विद्यार्थ्यांना मिळाली प्रवेशाची संधी

BEST Bus Strike: मुंबईकरांचे हाल! बेस्ट कर्मचारी पुन्हा आक्रमक, संपावर जाण्यास ठाम

Marathi News Updates : केरळमध्ये ईडीची मोठी कारवाई; कोझिकोडमधील ८ ठिकाणी छापे

पुण्यातील 'कॅफे फ्लाईंग जिप्सी'मध्ये पहाटे थरार, रीलस्टार Madhavi Kumbhar सोबत ७ जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT