कोल्हापूर

पैलवान युवराज पाटील यांच्या स्मृती नवोदितांना प्रेरणादायी

CD

87450
पैलवान युवराज पाटील यांच्या
स्मृती नवोदितांना प्रेरणादायी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २ ः ‘‘कुस्तीसम्राट युवराज पाटील यांनी १९७५ ते १९८५ च्या दरम्यान कुस्ती क्षेत्रात आपल्या चपळाईने निर्माण केलेला दबदबा नवोदित मल्लांना निश्‍चितच प्रेरणादायी ठरेल,’’ असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केले.
कुस्तीसम्राट युवराज पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज जिल्हा तालीम संघाच्या कार्यालयात पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, ‘‘पंधरा वर्षांपूर्वी कोल्हापूरकरांसह महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांना लाडका असणारा बागडी डाव टाकून चितपट करणारा हा मल्ल अपघातात गेला. त्याच्या आठवणी आणि त्याचा खेळ सर्वांच्याच आठवणीत राहणारा आहे. चपळाईने समोरील मल्लाला चितपट करणारा हा अवलिया आजही नवोदितांना स्फूर्तिदायी ठरत आला आहे. यावेळी सचिव अशोक पोवार, संभाजी पाटील, अशोक माने, उत्तम चव्हाण, नीलेश देसाई, यशवंत मुंडळे, महादेव कुंभार, रामा धर्मोजी, आनंदा खराडे, विजय पाटील, दादू चौगुले (कनिष्ठ), जयकुमार शिंदे, महेश नलवडे, प्रकाश खोत आदींसह मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Stock Update : पेट्रोल डिझेल टंचाईवर अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी केला खुलासा; साठ्याचेही सांगितलं गणित

Ashok Kharat Case Update : अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक दावा

मुलगी झाली हो...! कमळी मालिकेतील अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

Gaganyan Video : गगनयान अंतराळवीरांचा 'सुपरमॅन' मोड ऑन! व्हॉमिट कॉमेटमध्ये तरंगतानाचा व्हिडिओ व्हायरल

नवी मुंबईत ट्रॅफिकमुक्त प्रवासाचा मोठा निर्णय! तुर्भे उड्डाणपूल, डबल टनेल... वाहतूक कोंडीला ब्रेक लागणार

SCROLL FOR NEXT