कोल्हापूर

अपघातात मृताच्या कुटुंबियांना मदत

CD

chd32.jpg
87500
तडशिनहाळ : कै. रमेश कडोलकर यांच्या कुटुंबीयांकडे मदत निधी देताना मस्ती की पाठशाला ग्रुपचे सदस्य.
-------------------------
अपघातात मृताच्या कुटुंबीयांना मदत
ठेव पावती, शालेय साहित्य; तुर्केवाडी येथील माजी विद्यार्थ्यांचे दातृत्व
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३ : तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील जनता विद्यालयाच्या २००३ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी तडशिनहाळ (ता. चंदगड) येथील अपघातात मृत तरुण रमेश कडोलकर (वय ३३) याच्या कटुंबीयांना ३५ हजार रुपयांची मदत केली.
मृत रमेश हा शिनोळी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीत नोकरीला होता. कामावरून घरी येताना अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंब अडचणीत आले. हे समजताच या तरुणांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर मदतीचे आवाहन केले. मित्रांनी मदतीचे हात पुढे केले. पस्तीस हजार रुपयांची रक्कम जमा झाली. सतीश हलकर्णीकर, रवींद्र कोनेवाडकर, दौलत पाटील, पुंडलिक मसूरकर यांनी कडोलकर यांच्या घरी जाऊन ही रक्कम त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. यामध्ये तीस हजार रुपयांची ठेव पावती, पाच हजार रुपयांच्या शालेय साहित्याचा समावेश आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश म्हणून रोपटेही दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT