कोल्हापूर

रंगकर्मींसाठीची कार्यशाळा गडहिंग्लजला उत्साहात

CD

gad31.jpg
87470
गडहिंग्लज : नगरपरिषद व कला अकादमीतर्फे रंगकर्मींसाठी आयोजित कार्यशाळेप्रसंगी प्रदीप शिवगण, शिवाजी पाटील, इंद्रजित बंदसोडे यांच्यासह कलाकार.
--------------------------
रंगकर्मींसाठीची कार्यशाळा
गडहिंग्लजला उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : येथील गडहिंग्लज नगरपरिषद आणि गडहिंग्लज कला अकादमीतर्फे परिसरातील रंगकर्मींसाठी कार्यशाळा झाली. तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत अभिनेते व दिग्दर्शक प्रदीप शिवगण यांनी कलाकारांना प्रशिक्षण दिले. कार्यशाळेत २५ कलाकार सहभागी झाले होते.
गाभ चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जत्राटकर व निर्माते मंगेश बोरटे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्‍घाटन झाले. कार्यशाळेत नाट्य अभिनय, चित्रपट निर्मिती, संहिता आणि ऑडिशन कसे द्यावे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रात्यक्षिकही करून घेतले. कार्यशाळेत सहभागी कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्‍यात आले.
प्रदीप शिवगण यांच्यासह कला अकादमीचे शिवाजी पाटील यांनी समारोप प्रसंगी मार्गदर्शन केले. विशाखा जोशी, रामय्या हिरेमठ, अरुण पाटील, दत्तात्रय सुतार, प्रभाकर दुंडगे, ऊर्मिला कदम, इंद्रजित बंदसोडे यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT