कोल्हापूर

शरद आयटीआयच्या विद्यार्थ्यांची निवड

CD

jsp320
87507
यड्राव : येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह अनिल बागणे, प्राचार्य प्रा. रमेश भरमगोंडा आदी.

शरद आयटीआयच्या विद्यार्थ्यांची निवड
टाटा, एक्साईड, यझाकी, मॅगनासारख्या कंपन्यांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. ३ : यड्राव येथील सहकाररत्न शामरावजी पाटील-यड्रावकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शरद आयटीआय) येथील सर्वच्या सर्व ७४ विद्यार्थ्यांची विविध कंपन्‍यांमध्ये अॅप्रेंटिसशिपसाठी निवड झाली आहे. यामध्ये टाटा मोटर्स-पुणे, एक्साईड इंडस्ट्रीज लि., अहमदनगर, टाटा ऑटो कॉम पुणे, यझाकी इंडिया प्रा.लि. पुणे, मॅगना ऑटोमोटिव्ह इंडियन-पुणे, रत्नाकर एंटरप्रायजेस, युनिक ऑटो असेम्‍बलीज अशा कंपनीत निवड झाली आहे.
आयटीआयमधील इलेक्‍ट्रिशियन-२०, फिटर-१६, मोटर मेकॅनिकल-२२, वेल्डर-१६ या विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
शरद आयटीआयने आतापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी दिली आहे. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन व सहकार्य केले आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील आयटीआयमधील विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी शरद आयटीआय अग्रेसर राहिले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. यासाठी ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. अभिजित केकरे, प्राचार्य आर. बी. भरमगोंडा, आदींचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

विद्यापीठाने काही घडलंच नाही हे सांगायला लावलं, अत्याचार प्रकरणावरून विद्यार्थीनींचे प्रशासनावर गंभीर आरोप

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT