कोल्हापूर

आजऱ्यातील झाडांची कत्तल थांबवा

CD

आजऱ्यातील झाडांची कत्तल थांबवा
समाजसेवक नरसू शिंदे सामाजिक संस्थेची मागणी ः तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३ ः आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुका नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. आजरा व चंदगड तर डोंगराळ व जंगलानी व्यापलेले आहेत. या तालुक्यामध्ये सध्या सुबाभूळ, निलगिरी या झाडांबरोबर स्थानिक प्रजातीची झाडे तोडली जात आहेत. याला प्रतिबंध करण्याची गरज आहे, अशी मागणी समाजसेवक नरसू शिंदे सामाजिक संस्थेने केली आहे. आजरा तहसीलदारांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, चार वर्षांपासून वनविभागाच्या एफडीसीएमकडून निलगिरी व सुबाभूळ या झाडांची तोड सुरू आहे. मौजे एमेकोंडजवळ लाकूड डेपो उभारला आहे, पण निलगिरी व सुबाभूळ यांची शासन मान्यतेनुसार तोड सुरू असली तरी स्थानिक प्रजातीची झाडेही यातून तोडली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. असाच प्रकार आजऱ्यासह तालुक्यातील जंगल भागात घडत आहे. येथील स्थानिक जातीची झाडेही तोडून पळवली जात आहेत. याबाबत कार्यवाही करण्याची गरज आहे. निवेदनावर समाजसेवक नरसू शिंदे, अमर मटकर, आनंदा सुतार, सुधाकर घोरपडे, शिवाजी भुगुत्रे, भिकाजी गोंधळी यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT