कोल्हापूर

डीकेटीईच्या २१ विद्यार्थ्यांची निवड

CD

ich33.jpg
87604
इचलकरंजी ः ‘डीकेटीई’च्या इलेक्ट्रिकल व ईएनटीसी विभागातील ॲक्युटेक कंपनीत निवड झालेले विद्यार्थी व मार्गदर्शक.

‘डीकेटीई’च्या २१ विद्यार्थ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ४ ः येथील ‘डीकेटीई’च्या इलेक्ट्रिकल व ईएनटीसी इंजिनिअरिंग विभागातील २१ विद्यार्थ्यांची ॲक्युटेक पॉवर सोल्युशन या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे. यूपीएस पॉवर बॅकअपमधील नामांकित ही कंपनी आहे. या कंपनीतील तज्ज्ञ मंडळींनी ‘डीकेटीई’स भेट दिली. त्यामध्ये इलेक्ट्रिकल व ईएनटीसी इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यूद्वारे निवड केली.
‘डीकेटीई’ नेहमी इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट वाढीसाठी व तंत्रशिक्षणामधील विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेजवर नोकरी देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील नवनवीन बदलांचा अभ्यास करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे ॲक्युटेक पॉवर सोल्युशन या नामांकित कंपनीत प्लेसमेंट झाले आहे.
यशाबद्दल अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, ईएनटीसी विभागप्रमुख डॉ. एस. ए. पाटील, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. एन. पाटील, टीपीओ जी. एस. जोशी यांचे मार्गदर्शन मिळाले.
-----------
विद्यार्थ्यांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू
‘डीकेटीई’ आणि ॲक्युटेक पॉवर सोलुशन, मुंबई यांच्यामध्ये बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधील विद्यार्थ्यांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्र सुरू केले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना यूपीएस क्षेत्रातील अद्यायवत प्रशिक्षण देण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच तेथे पॉवर टेक्नॉलॉजी क्षेत्रात विद्यार्थी रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रकल्प पूर्ण करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

India Sports Economy: भारतीय क्रीडा अर्थव्यवस्था २०० कोटी डॉलर पार; २०२५ वर्षामध्ये १३.४% वाढ; क्रिकेटचा वाटा सर्वाधिक ८९ टक्क्यांचा

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Chhatrapati Sambhajinagar: जुन्या शहरात पुन्हा धावणार स्मार्ट बस – पर्यटक व नागरिकांसाठी सुविधा वाढवणार

Yavatmal News : एमपीएससी पूर्वतयारी परीक्षेत यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT