कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

CD

87639
...
मतमोजणीतील जबाबदारी चोखपणे पार पाडा
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची अधिकाऱ्यांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः ‘मतमोजणी केंद्रावरील सर्व व्यवस्था पूर्ण असल्याची खात्री करा. आवश्यक असणारी सर्व साधने मागून घ्या. आपल्याकडे जी जबाबदारी देण्यात आली आहे, ती चोखपणे पार पाडा. सर्व मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडूया,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेतली.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस विभागाने मतमोजणी केंद्र परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी. मतमोजणीसाठी लावण्यात आलेल्या टेबलवर आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध करून द्या. मतमोजणी कक्षात व बाहेर फेरीनिहाय मतमोजणीचे निकाल दर्शवणाऱ्या स्क्रीन बसवल्याची खात्री करा. तसेच या ठिकाणी विद्युत व्यवस्था, पंखे, संगणक, फॅक्स, इंटरनेट व्यवस्था, पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह आदी सुविधा दिल्याची खात्री करा. मतमोजणीसाठी उमेदवारांकडून नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना ओळखपत्र द्या. मतमोजणी कामातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने वेळेत अल्पोपहार व भोजन द्या. तसेच या ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका व आवश्यक ती औषधे व उपकरणे वैद्यकीय पथकासह तयार ठेवा, तसेच मतमोजणी दिवशी वादळी पाऊस आला तरीही ही शक्यता गृहीत धरुन आवश्यक त्या उपाययोजना तयार ठेवा.’
यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षातील टेबलची रचना, उमेदवार प्रतिनिधींची बैठक व्यवस्था, माध्यम कक्षातील सुविधा, सीसीटीव्ही व्दारे नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी ठिकाणी ये-जा करण्याचे मार्ग आदी विषयांचा आढावा घेतला.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल भिंगारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, सहायक सूक्ष्मनिरीक्षक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT