कोल्हापूर

लायसेन्‍स कधी आणि कसे

CD

फिट राहा, लायसेन्स मिळवा.. पण नूतनीकरणही करा
अपघातानंतर येते जाग ः परवान्याला नसते वयाची अट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.३ ः तुम्ही फीट राहा, वाहन चालवून दाखवा आणि वय कितीही असू दे तुम्हाला वाहन चालविण्याचा परवाना नक्की मिळतो. केवळ चाळीस वर्षांनंतर प्रत्येक पाच वर्षांनी त्याचे नूतनीकरण करावे लागते. यावेळी किमान एमबीबीएस असलेल्या डॉक्टरांचे ‘फिट’ असलेले सर्टिफिकेट द्यावे लागते.
कोण विचारतोय.. दंड करेल.. भरायचा... अशा अविर्भावात राहणे चुकीची ठरते. कारण वाहन चालविताना त्याचा परवाना असणे आवश्‍यक आहे. अपघात झाल्यास त्याची आवश्‍यकता भासते. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणालाही वाहन चालविण्याचा परवाना मिळतो. यासाठी कच्चा परवाना घ्यावा लागतो. त्यानंतर वाहन शिकून ते चालवून दाखवून पक्का परवाना घ्यावा लागतो. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागते. वयाच्या दखाल्यासह नियमानुसार शुल्क भरल्यास ही प्रक्रिया पूर्ण होते. तुम्ही वयाच्या एकोणीसाव्या वर्षी वाहन परवाना घेतला असल्यास त्याचे नूतणीकरण साधारण वीस वर्षांनंतर येते. मात्र, चाळीस वर्षांनंतर प्रत्येक पाच वर्षांनी त्याचे नूतनीकरण करावे लागते. यासाठी किमान एमबीबीएस पदवी असलेल्या डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट लागते. तुमचे वय कितीही असले आणि तुम्हाला वाहन चालवता येत असल्यास तुम्हाला तुमच्या कोणत्याही वयात हा परवाना मिळू शकतो.
...
परवाना संपण्याची मुदत ...
वाहन चालविण्याचा परवाना केव्हा संपणार याची मुदत त्यावर लिहिलेली असते. आज अपघातात ठार झालेले डॉ. व्ही. एम. चव्हाण यांचा वाहन चालविण्याचा परवाना नूतनीकरणाची मुदत संपून चार वर्षे उलटली आहेत, तरीही त्यांनी परवाना नूतनीकरण केलेले नसल्याचे दिसून आले आहे.
...

‘वाहन चालविण्याचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी एक वर्षाची मुदत असते. या काळात परवाना नूतनीकरण होते. मात्र, ती मुदत संपल्यानंतरही परवाना नूतनीकरण केले नाही तर तो परवाना रद्द होतो. तो मिळविण्यासाठी पुन्हा सर्व प्रक्रिया करावी लागते. कच्चा परवाना पुन्हा काढावा लागतो. त्यानंतर चाचणी देऊन पक्का परवाना घ्यावा लागतो.’
रोहित काटकर,
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT