कोल्हापूर

प्रचाराचे मुद्दे

CD

दत्तक प्रकरण मंडलिकांवर ‘बूमरँग’

प्रचाराचा अनाठायी मुद्दा : लोकांना पटलाही नाही आणि पचलाही नाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर टीका न करण्याची घोषणा महायुतीतील नेत्यांनी केली होती, पण खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी मात्र थेट शाहू महाराज यांच्या दत्तक विधानावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. पण निकालानंतर हेच प्रकरण मंडलिक यांच्यावर ‘बूमरँग’ झाल्याचे स्पष्ट झाले.
विद्यमान छत्रपती शाहू महाराज यांचे दत्तक विधान होऊन ६०-६२ वर्षांचा काळ उलटला आहे. त्यामुळे तो प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नव्हता. तरीही हा मुद्दा‍ प्रा. मंडलिक यांनी प्रचारात आणला. त्याचे कमी-अधिक, चांगले-वाईट पडसाद उमटले, पण त्यांनी केलेल्या आरोपाचा निकालावर कोणताही प्रभाव पडला नसल्याचे स्पष्ट झाले.
प्रा. मंडलिक यांच्या प्रचारात पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे, माजी मंत्री भरमू पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासह महायुतीतील अन्य नेत्यांचा सक्रिय सहभाग दिसला. पण यापैकी एकाही नेत्याने थेट शाहू महाराज यांच्यावर टीका केली नाही किंवा त्यांच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले नाही. असे असताना प्रा. मंडलिक यांनी कोवाड येथे झालेल्या सभेत शाहू महाराज हे राजर्षी शाहूंचे वारसदारच नसल्याची टीका केली. शाहू महाराजांनी यावर खुलासा करावा, अशीही मागणी केली, त्यावरून आंदोलन झाल्यानंतरही ते आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले.
एकीकडे प्रा. मंडलिक यांच्या या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात या दत्तक विधान प्रकरणाशी संबंधित राजवर्धन कदमबांडे यांना कोल्हापुरात प्रा. मंडलिक यांच्या प्रचारासाठी आणले गेले. कदमबांडे यांनी यापूर्वी कधी या विषयावर भाष्य केले नसताना त्यांनी निवडणुकीत मात्र मीच राजर्षींचा वारस असल्याचे सांगितले. पण याचीही गरज नव्हती, हेसुद्धा लोकांना आवडले तर नाहीच पण पचनीही पडले नसल्याचे निकालवरून स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT