कोल्हापूर

गड-होर्डिंग काढले

CD

गडहिंग्लजला पाच होर्डिंग काढले
ग्रामीण भागात ३१ पैकी बाराच अधिकृत : उर्वरित होर्डिंग मालकांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. ४ : घाटकोपर घटनेनंतर गडहिंग्लज पंचायत समितीने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागात होर्डिंग तपासणी मोहीम राबविली. या तपासणीत ३१ पैकी केवळ बाराच होर्डिंग अधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनधिकृत असलेली पाच होर्डिंग काढली आहेत. उर्वरित १४ होर्डिंग मालकांना नोटीस बजावली आहे.
घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपाशेजारी असलेले भलेमोठे होर्डिंग कोसळले. यात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर सर्वत्र होर्डिंग तपासणीची मोहीम हाती घेतली. येथील पंचायत समितीने अखत्यारित येणाऱ्या ग्रामीण भागात ही मोहीम राबविली. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून होर्डिंगची तपासणी केली. मुत्नाळ (३), महागाव (२), हरळी बुद्रुक (४), तेरणी (१), गिजवणे (२), बेळगुंदी (२), नेसरी (६), हलकर्णी (२), हेब्बाळ कसबा नूल (१), भडगाव (४), निलजी (१), खणदाळ (१), अत्याळ (२) या गावांमध्ये एकूण ३१ होर्डिंग असल्याचे आढळून आले.
यातील केवळ १२ होर्डिंग अधिकृत असल्याचे निष्पन्न झाले. मुत्नाळमधील ३, नेसरीतील ४, हलकर्णीची २, महागाव, तेरणी, हेब्बाळ कसबा नूल येथील प्रत्येक एका होर्डिंगचा समावेश आहे. तर १९ होर्डिंग अनधिकृत असल्याचे आढळून आले. यातील महागाव, हरळी बुद्रुक, खणदाळमधील प्रत्येकी एक तर बेळगुंदीतील दोन होर्डिंग काढण्यात आली आहेत. हरळीच्या तीन, गिजवणे, नेसरी, अत्याळच्या प्रत्येकी दोन, भडगावच्या चार, निलजीच्या एका होर्डिंग मालकाला नोटीस बजावली आहे.

चौकट...
* २४९ लहान जाहिरात फलक काढले
ग्रामीण भागात मोठ्या होर्डिंगची संख्या तशी कमी आहे. मोठ्या गावासह महामार्ग, राज्यमार्गावरील गावांतही होर्डिंग आहेत. पण, लहान जाहिरात फलकांची संख्या मोठी होती. ग्रामपंचायतींनी आपापल्या गावातील विनापरवानगी उभारलेले असे २४९ जाहिरात फलक काढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT