कोल्हापूर

मतमोजणी केंद्रा हुरहूर आणि जल्लोष

CD

अन् संजय मंडलिकांनी केंद्रावरून काढता पाय घेतला

सकाळ वृतसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः सकाळी आठ वाजता सुरू झालेली कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणीची हुरहूर साधारण दुपारी साडेबारा एक दरम्यान कल स्पष्ट झाल्यावर संपली. पुढे एकतर्फी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज विजयी होणार असल्याचे दिसले आणि विजयी होणार असा आठव्या फेरीपर्यंत दृढ निश्‍चय असलेले महायुतीच्या शिवसेनेचे उमेदवार खासदार संजय मंडलिकांनी काढता पाय घेतला. पुढे मतमोजणी केंद्रातील हुरहूर संपली आणि न्यू पॅलेसवर विजयाचा जल्लोष सुरू झाला.
रमणमळा येथील धान्य गोदामात कोल्हापूर लोकसभा मतदार संघाच्या सहा विधानसभा मतदार संघातील मतमोजणी होती. खुद्द जिल्हाधिकारी अमोल येडगे संपूर्ण केंद्रावर लक्ष ठेवून होते. सकाळी आठ वाजता टपाली मतांचे एकत्रीकरण केले. त्यानंतर एक एक करीत कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, कागल, राधानगरी आणि चंदगड विधानसभा मतदार संघातील मोजणी सुरू झाली. साधारण अर्धा-पाऊण तासांत एक फेरी पूर्ण होत होती. येथे प्रत्येक फेरीत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आघाडीवर होते. सकाळी दहाच्या सुमारास उमेदवार असलेल्या मंडलिक स्‍वतः मोजणी केंद्रावर आले. त्यांना त्यांच्या विजयाची खात्री होती. पहिल्या सहा फेरी मध्ये महाराज आघाडीवर असतानाही त्यांनी मतमोजणी केंद्रावर अजून भरपूर फेऱ्या आहेत. मला विजयाची खात्री आहे, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, साधारण पुढील दीड-दोन तासांमध्येच त्यांच्या हक्काच्या कागल मतदार संघातील त्यांचे मताधिक्य कमी झाल्याचे त्यांना दिसले. पुढे आशा होती ती चंदगडची. मात्र तेथेही त्यांची मते कमी आल्यानंतर त्यांना पराभवाची जाणीव झाली आणि त्‍यांनी तेथून काढता पाय घेतला.

प्रत्येक फेरीच्या आकडेवारींची जुळवाजुळव
उमेदवारी प्रतिनिधींना प्रशासनाकडून दिलेल्या ओळखपत्राची लेस भगवी होती आणि आघाडीच्या प्रतिनिधींना दिलेल्या ओळखपत्राची लेस काळी होती. त्यामुळे कोण कोणाच्या गटातील आहे ते लेसवरून समजत होते. त्यामुळे कोणत्या गटाचे प्रतिनिधी किती धावपळ आणि प्रत्येक फेरीच्या आकडेवारींची जुळवाजुळव कशी करीत होते हे दिसत होते. काहींनी रायटींग पॅड, वह्या, कॅल्युकेलट सोबत आणले होते.
-----
प्रत्येक प्रतिनिधीच्या हातात स्लिप होत्या. त्यावर गावनिहाय आकडे प्रिटेंड होते. मशिन मधील आकडे ते स्लीपवर भरून शेजारील प्रतिनिधीकडे देत होते. तो प्रतिनिधी सर्वांची जुळवाजुळव करुन बेरीज करीत होता. त्यामुळे कोणत्या केंद्रावर, कोणत्या फेरीत कोणाला किती मते मिळाली याची नोंद त्यांच्याकडे काही क्षणात होत होती. त्यावरूनच ते विजयाचा आणि मताधिक्याचा अंदाज लावत होते. विशेष म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी शेवटी जाहीर केलेल्या आकडेवारींची आणि प्रतिनिधींच्या आकडेवारीक किरकोळ दोन ते पाच मतांचा फरक दिसत होता.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT