कोल्हापूर

माने मंत्रीपद

CD

धैर्यशील माने मंत्रिपदाच्या शर्यतीत

पश्‍चिम महाराष्ट्रातील शिंदे गटाचा एकमेव विजय

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव झाल्याने देशात एनडीएची सत्ता पुन्हा आल्यास हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा त्यांनी मिळवलेला विजय, पश्‍चिम महाराष्ट्रात शिंदे गटाचे एकमेव खासदार, चांगले भाषण कौशल्य, विषयांची जाण या जोरावर ते मंत्रिपदाचे दावेदार होऊ शकतात.
महायुतीत भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र होते. या महायुतीला महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. भाजपने २८, शिंदे गटाने १५ तर राष्ट्रवादीने चार जागा लढवल्या. ‘रासप’ ला बुलढाण्याची जागा देऊन त्याठिकाणी जानकर यांना उमेदवारी देण्यात आली होती; पण त्यांचा पराभव झाला.
आज झालेल्या निकालात पश्‍चिम महाराष्ट्रात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा धुव्वा उडाला. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक हेही पराभूत झाले. शिंदे गटाला राज्यात केवळ सात जागांवर विजय मिळवता आला. त्यात शिंदे यांचे पुत्र श्रीकांत, ठाण्यात नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, संदीपान भुमरे, हातकणंगलेतून धैर्यशील माने, मावळमध्ये श्रीरंग बारणे व बुलाढाण्यातून प्रताप जाधव विजयी झाले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला स्थान द्यायचे झाल्यास शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत, अनुभवी श्री. वायकर, दुसऱ्यांदा विजयी झालेले बारणे यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो; पण पश्‍चिम महाराष्ट्रात पक्षवाढीचा विचार डोळ्यापुढे ठेवून मंत्रिपद द्यायचे झाल्यास माने हे एकमेव उमेदवार आहेत. त्यात शिंदे यांनी त्यांच्यासाठी मोठ्या जोडण्या मतदारसंघात लावल्या होत्या. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशीही त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. स्वतः शिंदे मुख्यमंत्री असल्याने पुन्हा मुलाला केंद्रात मंत्रिपद मिळेल का याची शाश्‍वती नाही. त्यातून माने यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT