Kolhapur News:  sakal
कोल्हापूर

Kolhapur News: आता काय असणार संजय मंडलिकांची पुढची दिशा? मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांची घेणार भेट

आजची बैठक केवळ आभाराची होती. कागल, करवीर आणि राधानगरीत कमी मते मिळाली |Today's meeting was just a thank you. Fewer votes were polled in Kagal, Karveer and Radhanagari

सकाळ वृत्तसेवा

Kolhapur News: कागलमधून जाणारा शक्तिमार्ग, भुदरगडमधील अदानींचा प्रकल्प, उशिरा जाहीर झालेली उमेदवारी अशी किरकोळ कारणे पराभवापर्यंत पोहोचली. या व्यतिरिक्त कारणांचे आत्मपरीक्षण करणार आहे.

येथून पुढेही महायुती म्हणून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि घटक पक्षांच्या माध्यमातून जनतेसाठी कार्यरत राहणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे’, असे मत माजी खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.


मंडलिक यांनी आभार प्रदर्शनासाठी रुईकर कॉलनीतील निवासस्थानी आज दुपारी बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले. बैठकीसाठी जिल्ह्यातील महायुतीचे नेते उपस्थित होते.

यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, समरजितसांह घाटगे, गगनबावड्यातून पी.जी.शिंदे, आजऱ्याचे अशोक चराटी, माजी मंत्री भरमू पाटील, अजित नरके, हेमंत कालेकर, प्रकाश चव्हाण यांचा समावेश होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरू झालेली बैठक अर्धा-पाऊण तास चालली. यामध्ये खासदार महाडिक यांनी सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाची माहिती दिली.


मंडलिक म्हणाले, ‘आजची बैठक केवळ आभाराची होती. कागल, करवीर आणि राधानगरीत कमी मते मिळाली. शहर, करवीर, दक्षिणमध्ये काही प्रमाणात साथ मिळाली. नूतन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना आम्ही पूर्वीपासूनच मान देतो. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांना शुभेच्छा देतो.

हातकणंगलेतून विजयी झालेलेले आमचे मित्र धैर्यशील माने यांनाही शुभेच्‍छा देतो. त्यांच्यासह राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी यावा. कोल्हापूरचा विकास व्हावा. मला सहा लाखांपर्यंत मते मिळाली. कागल, चंदगड तालुक्यातून जी मते कमी पडली, त्यामुळे पराभव झाला.

दक्षिण आणि कोल्हापूर (उत्तर) मध्ये अतिशय अटीतटीने लढाई झाली. वडील सदाशिवराव मंडलिक यांनी दिलेल्या शिकवणीनुसार, विजयी झाले की हरखून जाऊ नये आणि पराभव झाला की खचून जाऊ नये. त्यानुसार मी पुन्हा महायुतीच्या माध्यमातून जनतेसाठी पुन्हा ताकदीने कार्यरत राहणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुधा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

Amboli Ghat Accident: 'आंबोली घाटामध्ये टेम्पो दरीत कोसळला'; ब्रेक निकामी झाल्याने दुर्घटना, चालक सुखरूप

Nashik Central Jail : नाशिक कारागृहात 'ॲलन कार्ड' घोटाळा: शिपाई आणि बंदीविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT