कोल्हापूर

इचलकरंजी महापालिकेची ८४ मिळकतधारकांना नोटीस

CD

इचलकरंजी महापालिकेची
८४ मिळकतधारकांना नोटीस
इचलकरंजी, ता.५ ः घरफाळा भरण्यासाठी मिळकतधारकांनी धनादेश दिले होते. पण बँकेतून धनादेश न वटताच परत आल्याबद्दल महापालिकेकडून ८४ मिळकतधारकांवर कर विभागाकडून न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला जाणार आहे. तथापि, शेवटची संधी म्हणून दावापूर्व नोटीस देत एक हजार रुपये दंडासह धनादेशाची रक्कम भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. मुदतीनंतर पुढील फौजदारी कारवाईची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
महापालिकेतर्फे दरवर्षी मार्चमध्ये घरफाळा व पाणी पट्टी वसुलीवर भर दिला जातो. धडक मोहिम राबवत वेगवेगळ्या प्रकारची कारवाई केली जाते. अगदी मिळकती सील करण्यासारखी कटू कारवाईही केली जाते. यासाठी विविध पथकांची नियुक्ती केली जाते. पथकांकडून तुर्तास कारवाई टाळण्यासाठी अनेक मिळकतधारक धनादेश देतात. पण अनेक मिळकतधारकांचे धनादेश बँक खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे परत येतात. अशा मिळकतधारकांना कर विभागाकडून पहिल्या टप्प्यात सात दिवसांची नोटीस दिली होती. त्यामध्ये पुढील कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे काही मिळकतधारकांनी संबंधित रक्कम कर विभागाकडे जमा करीत पुढील कारवाई टाळली.
तथापि, अद्यापही ८४ मिळकतधारकांनी रक्कम भरलेली नाही. सुमारे ४१ लाख इतकी ही रक्कम आहे. संबंधितांना सतत सूचना केली आहे. पण त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे कर विभागाने आता या सर्वाना वकिलामार्फत दावापूर्व नोटीस लागू केली आहे. त्यामध्ये धनादेशाची रक्कम व दावा नोटीस खर्च एक हजार रुपये याप्रमाणे १५ दिवसांत रक्कम भरण्याची सूचना केली आहे. अन्यथा, न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संबंधित मिळकतधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
-----
घरफाळा वसुलीवेळी दिलेले धनादेश बँकेतून न वटताच परत आल्यामुळे संबंधित ८८ मिळकतधारकांना दावापूर्व नोटीसा दिल्या आहेत. पंधरा दिवसात संबंधित रक्कम कर विभागाकडे भरणा केल्यास त्यांच्यावरील पुढील कारवाई थांबणार आहे.
-आरिफा नुलकर, कर अधिकारी, इचलकरंजी महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT