कोल्हापूर

वेतनाच्या आश्‍वासनाची पूर्तता करावी

CD

ich52.jpg
88216
इचलकरंजी : अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आमदार प्रकाश आवाडे यांना निवेदन दिले.

वेतनाच्या आश्‍वासनाची पूर्तता करावी
कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आमदार आवाडेंकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ६ : अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या वेतन देण्याच्या आश्‍वासनाची पूर्तता करावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांना दिले.
वेतनाच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी आंदोलन केले होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आशा सेविकांचा मानधन वाढीचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळात माडण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्‍वासनाची पूर्तता व्हावी, अशी मागणी आमदार यांच्याकडे केली आहे.
अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी ४ डिसेंबर ते २५ जानेवारी असा ५२ दिवसांचा संप केला होता. यावेळी सेविकेस २६ हजार, तर मदतनिसांना २२ हजार वेतन देण्याची मागणी केली होती. आशांचा मानधन वाढीचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे त्यांचा प्रश्‍न सुटताच मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्याचे आश्वासन दिले होते. याची नोंद सचिव अनुप कुमार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये झाली आहे. त्यानुसार मंत्री तटकरे यांच्याशी संपर्क करून त्यांना सूचित करावे. प्रश्‍नाबाबत पाठपुरावा करावा. वेतन लागू करण्याची चर्चा कृती समितीबरोबर व्हावी, यासाठी पाठपुरावा करावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव कृती समितीला अभ्यासासाठी उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. शिष्टमंडळात सुनील बारवाडे यांच्यासोबत अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिम बंद केलं, आठवड्यात साहित्य विकायचं होतं, दगडूशेठ मदतीला धावला... 'कृष्णाईच्या लेकी' अभिनेत्याने सांगितला अनुभव

Gangapur Maize Crop Crisis : करपलेली मका मुरघाससाठी विकण्याची वेळ ; उत्पादन खर्चही निघणे कठीण; पश्चिम महाराष्ट्र-कर्नाटकातून चाऱ्यासाठी मागणी

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुंबई-पुण्यात गणेश विसर्जनाची लगबग; वाहतुकीपासून मिरवणुकीपर्यंत प्रत्येक अपडेट LIVE

Kolhapur Mumbai Special Train : दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून कोल्हापूर ते मुंबई, कलबुर्गीसाठी विशेष गाड्या जाहीर; पाहा रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक

Gyanesh Kumar Petition : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ; थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल, 'ते' 14 निर्णय वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT