कोल्हापूर

संजय मंडलिक घरीच

CD

कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात
माजी खासदार मंडलिक राहिले व्यस्त

कोल्हापूर : ‘एक पीक गेले म्हणून काय शेत पाडायचे असते काय? ज्यांनी मते दिली त्यांचा विचार करा, त्यांच्यासाठी पुन्हा कामाला लागा’, असे सांगून आज दिवसभर माजी खासदार संजय मंडलिक यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज दिवसभर मंडलिक यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. यातूनही वेळ काढून मंडलिक यांनी त्यांच्याच परिसरात राहत असलेले खासदार धैर्यशील माने यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले.
मंडलिकांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची सकाळी दहापासून ते रात्री दहापर्यंत त्यांच्या निवासस्थानी गर्दी होती. दुपारी बाराच्या सुमारास झालेल्या नेत्यांच्या बैठकीत विचारमंथन झाले. तेथे महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केली. यानंतर पुन्हा कार्यकर्ते मंडलिकांच्या भेटीसाठी थांबून होते. आम्ही कोणकोणत्या ठिकाणी कशी फिल्‍डिंग लावली होती, मतदान केंद्रावर काय काय स्थिती होती. कोणी दगाफटका केला, कोणी साथ दिली याचीही माहिती कार्यकर्ते तेथे देत होते.
कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात मंडलिकांचा दिवस गेला. नेमका पराभव का झाला याची माहिती कार्यकर्ते देत असले तरीही मंडलिकांकडून मात्र त्यांना झाले ते विसरून जा. एक पीक गेले म्हणून काय रान करायचे सोडून देता काय, अशी ग्रामीण भागातील उदाहरणे देऊन ज्यांनी मतदान केले त्यांच्यासाठी पुन्हा कामाला लागा. सहा लाख मतदारांनी आपल्यावर विश्‍वास ठेवला आहे. हार -जीत होत असते. आपण पुन्हा जोमाने कामाला लागायचे आहे. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी हीच शिकवण दिल्याचे ते कार्यकर्त्यांना सांगत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : कॉकरोच जनता पार्टी निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार; गांधी जयंतीला देशव्यापी आंदोलनाचा इशारा

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: मिरजेतील पहिल्या गणपतीचे विसर्जन; नदीवेस शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीसाठी गणेश तलावावर जय्यत तयारी

Soybean Crop: व्यथित शेतकऱ्याने पेटवून दिले सोयाबीनचे पीक

SCROLL FOR NEXT