कोल्हापूर

धैर्यशील माने निवासस्थान

CD

खासदार धैर्यशील माने यांच्या
घरी दिवसभर आनंदोत्सव
कोल्हापूरः खासदार धैर्यशील माने यांच्या विजयानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोबाईवरून संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. खासदार माने यांना त्यांनी उद्या (६) मुंबईत बोलवले आहे. दिवसभरात खासदार माने यांनी कणेरी मठावर जाऊन काडसिद्धेश्‍वर स्वामींची भेट घेतली. दिवसभर नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यामुळे रुईकर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी आनंदोत्सव सुरूच राहिला.
खासदार माने यांचा आश्‍चर्यकारकरीत्या विजय झाल्यानंतर कालपासून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. त्यांच्या निवासस्थानाचा परिसर गुलालाने न्हाऊन निघाला आहे. आज सकाळी आठपासूनच ते कार्यकर्ते, अधिकारी, नातेवाईक, मित्रमंडळींच्या शुभेच्छा स्वीकारत होते. त्यांच्या रुईकर कॉलनीतील घराजवळ कार्यकर्त्यांची गर्दी दिवसभर कायम होती. विक्रेते दारातच पुष्पगुच्छ, हार घेऊन उभे होते. कार्यकर्ते मानेंच्या सोबत उभे राहून सेल्‍फीसह छायाचित्रे घेत होते. दुपारी मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भेट घेऊन अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. काडसिद्धेश्‍वर स्वामींची भेट घेण्यासाठी गेल्यानंतर सुद्धा कार्यकर्ते थांबून होते. कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतानाच त्यांना येणारे फोन कॉल सुद्धा ते स्वीकारत होते. येईल त्याचे हसतमुखाने स्वागत करीत होते. गुलालाने ते स्वतः न्हाऊन निघाले होते. त्यांच्या सोबत कुटुंबीयांचेही अभिनंदन होत होते. मुंबईत एनडीए आघाडीची बैठक उद्या दुपारी एक वाजता वर्षा बंगल्यावर आहे. त्यामुळे शुभेच्छांच्या वर्षावातच त्याचीही तयारी सुरू होती. निवासस्थानी होणाऱ्या गर्दीमुळे तेथे आजही पोलिस बंदोबस्तही तैनात ठेवला होता. काही पोलिस, प्रशासनातील अधिकारी सुद्धा मानेंचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत होते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारीसुद्धा शुभेच्‍छांसाठी गाड्या भरून येताना दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुश्रीफ साहेब, मला माफ करा.! अजितदादा होते तो ये नौबत नही आती..! भैया मानेंचे पत्र

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT