कोल्हापूर

पाऊस ५ जून २०२५

CD

८८२२३
मॉन्सूनपूर्व पावसाच्या
जिल्ह्यात सरीवर सरी

कोल्हापूर, ता. ५ : जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने आज चांगली हजेरी लावली. शहरासह परिसरातही काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला.
जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. शहरात दुपारी चारनंतर काळे ढग जमू लागले. शिये, कसबा बावडा, गांधीनगर, फुलेवाडी परिसरात पावसाने जोरदार सुरुवात केली. पावसामुळे वाहतूकदारांची तारांबळ उडाली. कसबा बावडा परिसरात पंधरा ते वीस मिनिटे पाऊस झाला. शहरातही सीपीआर रुग्णालय, ताराबाई पार्क, नागाळा पार्क परिसरात चांगला पाऊस झाला. त्याने हवेत गारवा आला आणि उकाड्यापासून दिलासा मिळाला. फुलेवाडी येथे चौथ्या बसस्टॉपपर्यंत जोरदार पाऊस झाला; मात्र तेथून पुढे पाऊस नव्हता. महाराणी ताराराणी पुतळ्यापासून गांधीनगरपर्यंत चांगला पाऊस झाला. दरम्यान, रस्त्यावर माती पसरल्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहने घसरून पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Maharashtra News: अवघ्या दोनशे रुपयांत होणार जमिनींचे पोटहिस्से, मोजणी फीमध्ये सवलत; राज्य भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

Walking Benefits: फक्त 1 किमी चालण्याची सवय लावा! शरीरात होणारे बदल पाहून तुम्हीही चकित व्हाल

अभिनयातून व्यवसायाकडे वळला अभिजित केळकर; ‘प्रत्येक घासात अस्सल चव’ देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT