कोल्हापूर

दिव्यांगासाठीचे आंदोलन तात्पुरते स्थगीत

CD

दिव्यांगांसाठीचे आंदोलन तात्पुरते स्थगित
संग्राम सावंत ः आजऱ्यातील टोलमुक्ती आंदोलनाला पाठिंबा देणार
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ६ ः आजरा तहसीलदार कार्यालयावर सोमवारी (ता. १०) टोलमुक्ती आंदोलन होत आहे. यामुळे मुक्ती संघर्ष समितीने दिव्यांग व अन्य विषयांसाठी पुकारलेले बेमुदत आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. अशी माहिती मुक्ती संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष संग्राम सावंत यांनी दिली आहे.
मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने दिव्यांगांच्या बाबतीतील मागण्यांचा गांभीर्याने विचार करून कायदेशीररीत्या त्याची ताबडतोब सोडवणूक करावी. दिव्यांगांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी तहसीलदार, मुख्याधिकारी, नगरपंचायत  व गटविकास अधिकारी आजरा यांना निवेदन देऊन चर्चा केली होती. याबाबतीत प्रशासनाने सकारात्मकरीत्या प्रश्न सोडवण्यासाठीचा पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावले नाहीत, तर दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी तहसीलदार व पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा व नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार होते; परंतु टोलमुक्ती आंदोलन असल्यामुळे मुक्ती संघर्ष समितीने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याध्यक्ष संग्राम सावंत, सुरेश खोत, रूजाय डिसोझा, अबुसईद माणगावकर, संजय डोंगरे, बबन चौगुले, अहमद नेसरीकर, दिलीप कांबळे, इम्तियाज दिडबाग, अमिन कानडीकर, गौस माणगावकर, सुलेमान दरवाजकर, बबन कुरळे, आबुहुरेरा मानगावकर, जगदीश कुरुणकर, सुमिता चंदनवाले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

मोहसिन नक्वींच्या हातून नाकारलेले Asia Cup मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येणारच, पण...; BCCI सचिवांनी स्पष्टच सांगितलं

Paithan Farmer: खरीप पिके करपली, कर्जाचा ताण वाढला; पैठण तालुक्यात ५२ वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

SCROLL FOR NEXT