कोल्हापूर

देशी झाडांची हिरवाई विद्यापीठात बहरणार

CD

फोटो 88389
....
विद्यापीठात बहरणार देशी झाडांची हिरवाई
स्वच्छ हवेचा पुरवठा वाढणार; हरित परिसर विस्तारणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः वड, पिंपळ, कडुलिंब, रिटा अशा विविध देशी प्रजातीच्या झाडांनी शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस बहरणार आहे. या पुढील कालावधीत देशी, स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यास विद्यापीठाचे अधिक प्राधान्य राहणार आहे. त्यामुळे येथील हरित परिसर विस्तारणार असून, याठिकाणी स्वच्छ हवेचा पुरवठा वाढणार आहे.
कॅम्पसची जैवविविधता समृद्ध करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाकडून बारा वर्षांपासून स्थानिक प्रजातीची झाडे लावली जात आहेत. २०१९ च्या अहवालानुसार विद्यापीठ परिसरात सुमारे १३ हजार झाडांची वाढ झाली आहे. नव्याने सुमारे २० हजार झाडे लावली आहेत. वनस्पतीशास्त्र विभागाने ४० एकर जागेमध्ये लीड बोटॅनिकल गार्डन विकसित केले आहे. त्यामुळे शहरातील इतर परिसराच्या तुलनेत विद्यापीठ कॅम्पसमधील हवेचे पुरवठा, स्वच्छता यांचे प्रमाण अधिक आहे. शहराचे फुफ्फुस म्हणून या कॅम्पसला ओळखले जाते. येथे स्वच्छ हवेचे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी सातत्याने विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता कॅम्पसमध्ये होणाऱ्या नव्या इमारती, भुयारी मार्गाला जोडणारे रस्ते आदी परिसरात देशी, स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यात कडुलिंब, रिटा, आवळा, शिरीष, चिंच, बहावा आदी झाडांचा समावेश राहणार आहे.
.....
कोट
विद्यापीठाचा परिसर अधिक हरित आणि जैवविविधतेने समृद्ध करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. जलस्वयंपूर्णतेमध्ये विद्यापीठाला यश मिळाले आहे. कॅम्पसमध्ये देशी प्रजातीची झाडे लावली जाणार आहेत.
- डॉ. व्ही. एन. शिंदे, कुलसचिव

चौकट
विद्यापीठाची ‘हरित’ पावले
- रोज १ लाख १० हजार लिटर सांडपाण्याचा पुनर्वापर
- सात एकर परिसरातील बागेला ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा
- दरवर्षी पावसाच्या एकूण ३३ कोटी लिटर पाण्याची साठवणूक
- सौरऊर्जेच्या वापरातून दरवर्षी १७ लाख रुपयांची बचत
- वसतिगृहांमधील मेससाठी बायोगॅसचा वापर
- प्लास्टिकचा कमी वापर आणि कागदाजा पुनर्वापरावर भर

चौकट
विविध ९९ प्रकारची झाडे
विद्यापीठात विविध ९९ प्रकारची झाडे आहेत. सुमारे १४०० मोर, ११५ प्रकारचे पक्षी आणि ५५ प्रकारची फुलपाखरे कॅम्पसमध्ये आढळतात. दरम्यान, विद्यापीठ कॅम्पस शहराचे फुफ्फुस म्हणून कार्यरत असून, तो अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्याच्यादृष्टीने विद्यापीठ अधिक जोमाने पावले टाकणार आहे. त्याबाबतचा आराखडा बनवण्याचे काम विद्यापीठाकडून लवकरच सुरू केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT