कोल्हापूर

पेपरमध्ये चुका, पुर्नपरीक्षा घ्या

CD

लोगोः विद्यापीठ

पेपरमध्ये चुका, पुनर्परीक्षा घ्या
‘बी. टेक’च्या विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः डिझाईन ऑफ काँक्रेट स्‍ट्रक्चर-सेकंड या विषयाच्या पेपरमधील प्रश्नांमध्ये चुका आणि विसंगती होत्या. त्यातील अनेक प्रश्न अनुत्तरीत होते. त्यामुळे पेपर सोडविता आला नाही. ते लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने या विषयाची पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी बी. टेक (सिव्हिल) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन त्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालकांना पाठविले आहे. विद्यापीठातर्फे ३ मे रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत घेतलेल्या ‘डिझाईन ऑफ काँक्रेट स्‍ट्रक्चर-सेकंड’ या विषयाचा पेपर संख्यात्मक स्वरूपाचा होता. अचूक गणनेसाठी वैज्ञानिक कॅल्क्युलेटर वापरणे आवश्यक होते. मात्र, परीक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये या कॅल्क्युलेटरच्या वापरासाठी उल्लेख नव्हता. पेपरमध्ये सादर केलेल्या संख्यात्मक समस्या सोडविण्यासाठी ते आवश्यक होते. पेपरमधील चुकांमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. परिणामी, आम्ही विद्यार्थी गोंधळून गेलो. त्यामुळे पेपर पुरेशा प्रमाणात सोडविता आला नाही. त्याचा विचार करून परीक्षा मंडळाने या विषयाची पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली.

चौकट
पेपर पूर्ण लिहू शकलो नाही
पेपर संख्यात्मक स्वरूपाचा असल्याने या परीक्षेसाठी किमान साडेतीन ते चार तासांचा वेळ देणे आवश्यक होते. मात्र, तीन तासांचा कालावधी दिल्याने आम्ही पेपर पूर्णपणे लिहू शकलो नसल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
.....
कोट
या विद्यार्थ्यांचे निवेदन अद्याप परीक्षा मंडळाला मिळालेले नाही. ते मिळाल्यानंतर पेपर सेटर यांच्याकडून माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.
-डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT