कोल्हापूर

शाहू महाराज सकाळ भेट

CD

फोटो- M88456

उद्योग, इन्फास्ट्रक्चर वाढीसह
बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज; ‘सकाळ’ कार्यालयात संवाद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून उद्योग, आयटी, इन्फास्ट्रक्चर वाढीसह बेरोजगारी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नूतन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे सांगितले. शिवाजी उद्यमनगरातील ‘सकाळ’ कार्यालयाला त्यांनी आज भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. ‘सकाळ’चे संस्थापक कै. नानासाहेब परुळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सकाळ माध्यम समूहाचे सल्लागार संपादक श्रीराम पवार, संपादक निखिल पंडितराव यांनी स्वागत केले. यावेळी आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपसंपर्क प्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक माणिक मंडलिक, ‘सकाळ’चे सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतिन शहा उपस्थित होते.
जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कोणते मुद्दे प्राधान्याने घ्यायचे, यासाठी एक बैठक होईल. त्यामध्ये सर्वांची मते जाणून घेतली जातील. त्यानंतर प्राधान्यक्रमाने एक एक विषयासाठी केंद्र शासनातून भरीव निधी आणला जाईल, असेही शाहू महाराजांनी सांगितले. यावेळी पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी उपाय, विकासवाडी औद्योगिक वसाहत, आयटी पार्कसाठी प्रयत्न करणार आहे. कागलमध्ये जादा मते कशी, कोठून मिळाली, हे पाहायला आवडेल, असेही महाराजांनी सांगितले.
आमदार पाटील यांनी राज्यातील एकाही जिल्ह्यात केंद्र शासनातील ‘प्रसाद’ योजनेतून भरीव निधी मंजूर झाला नाही. तो कोल्हापुरात मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT