कोल्हापूर

शेअर मार्केट गुंतवणूकीच्या नावाखाली ३ लाखांचा गंडा

CD

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या
नावाखाली ३ लाखांचा गंडा

कोल्हापूर, ता. ६ ः शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याच्या अमिषाने ३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शुभम विजय धुमाळ (वय ३२, रा. शाहूमिल कॉलनी, राजारामपुरी) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याने वेगवेगळ्या लोकांकडून पैसे घेतले होते. शनिवार पेठेतील कार्यालय बंद करून तो पसार झाल्याने याबाबत ओंकार प्रशांत शिंदे (३२, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दाखल केली.
फिर्यादी ओंकार शिंदे याचा बांधकाम व्यवसाय आहे. त्याच्या ओळखीतील कृष्णात तोरस्कर याने संशयित शुभम धुमाळ याची ओळख करून दिली होती. धुमाळ याने शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याचे अमिष दाखवून फेब्रुवारी २०२४ मध्ये शिंदे यांच्याकडून ९९ हजार रुपये ऑनलाईन घेतले होते. दोन महिन्यांनंतर शिंदे यांनी परताव्याची मागणी केली असता धुमाळने टोलवाटोलवी सुरू केली होती. तसेच, शनिवार पेठेतील शहर उपअधीक्षक कार्यालयासमोरील धुमाळचे कार्यालयही बंद असल्याचे दिसले. धुमाळशी वारंवार संपर्क करूनही तो प्रतिसाद देत नव्हता.
धुमाळने शिंदे यांच्यासह कृष्णात तोरस्कर यांचीही २ लाखांची रक्कमही गुंतवून घेतली होती. या रकमेच्या बदल्यातही त्याने कोणताच परतावा न दिल्याने दोघांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. लक्ष्मीपुरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला मोठा धक्का? PoK ला भारताशी जोडण्याची मागणी, ११० दिवसांपासून सुरुये आंदोलन

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी भारतात आला होता कसाब? उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

SCROLL FOR NEXT