कोल्हापूर

गुंडाकडून तरूणाचे अपहरण व लुट

CD

गुंडाकडून तरुणाचे अपहरण करून लूट

राजारामपुरीत लूटमारीचे दोन प्रकार :
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, मारामारीचे गुन्हे दाखल असलेल्या गुंडाने तरुणाचे अपहरण करून त्याला लुटल्याचा प्रकार भारतनगर, साळोखे पार्कात घडला. संशयित विश्वजित ऊर्फ बिल्डर सौदागर कांबळे (रा. राजेंद्रनगर) व भोलेनाथ ऊर्फ भोल्या पप्पू साठे (वय १९, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) याच्यासह अनोळखी तिघांविरोधात राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शुभम दयानंद खवले (वय २७, रा. बावडा वसाहत, राजेंद्रनगर) याने फिर्याद दाखल केली.
फिर्यादी शुभम खवले बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून घरी येत असताना साळोखे पार्कात थांबलेल्या विश्वजित कांबळे व त्याच्या साथीदारांनी त्याला अडवले. जुन्या वादातून शुभमला पकडून एका निळ्या मोटारीतून जबरदस्तीने उचलून नेले. यावेळी शुभमचे वडील, भाऊ प्रतिकार करत असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली.
संशयित विश्वजित आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण करत दीड तोळे वजनाची ८२ हजारांची सोनसाखळी हिसकावल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. पोलिसांना संशयित भोल्या साठे याला गुरुवारी दुपारी अटक केली; तर मुख्य संशयितासह अन्य तिघे पसार झाले आहेत.
...
शाहूनगरातही लूटमार...
राजारामपुरी शाहूनगरातील नवशा मारुती मंदिरासमोर थांबलेल्या संभाजी नागोजी पोवार (वय ५७) यांना दमदाटी करून लुटण्यात आले. याप्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषिकेश बाबासो चौगुले ऊर्फ गेंड्या (वय २५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मद्यधुंद अवस्थेत आलेल्या ऋषिकेश चौगुलेने शिवीगाळ व मारहाण करीत खिशातील चार हजार रुपये काढून घेतल्याची फिर्याद पोवार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT