कोल्हापूर

ऊत्तरेश्वर थाळी वटेश्वर मंदिराजवळ सुरू

CD

88642

वटेश्वर मंदिराजवळ
‘उत्तरेश्वर थाळी’ सुरू

कोल्हापूर, ता. ७ : लायन्स क्लब, कोल्हापूर व मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने एस. टी. स्टॅण्ड जवळील वटेश्वर मंदिरानजीक उत्तरेश्वर थाळी सुरू झाली. कष्टकरी, हातावरचे पोट असणाऱ्या व्यक्तींना पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने ही थाळी सुरू केली आहे.
कोरोना काळापासून आजपर्यंत गंगावेशीत उत्तरेश्वर थाळीचे अन्नछत्र सुरू आहे. राजेंद्र चव्हाण, रवी मिसाळ, रवींद्र जाधव यांच्या संकल्पनेतून समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने उपक्रम सुरु केला. लायन्स क्लब राजारामपुरीतर्फेही किमान खर्चात डायलेसिस सेंटर, मोफत नेत्र तपासणी सेंटर, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यासह क्लबचे अध्यक्ष अविनाश पेंडुरकर व सहकाऱ्यांनी अन्नछत्राचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर उपक्रम सुरु झाला. थाळीचे उद्घाटन जिल्हा पोलिप्रमुख महेंद्र पंडित, क्लबच्या ज्येष्ठ सदस्या ऊमा शर्मा, अनंत जाजल, मीना जाजल यांच्याहस्ते झाले. यावेळी मातृभूमी ट्रस्ट व लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते. दररोज १२ वाजता अन्नछत्र सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: कोंढवे धावडे परिसरात मुसळधार पावसाने महापालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी उघड

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT