कोल्हापूर

रेन वॉटर हार्वेस्टींग सवलतीस मुदतवाढ द्या

CD

रेन वॉटर हार्वेस्‍टिंग सवलतीस मुदतवाढ द्या
शशांक बावचकर यांची मागणी : महापालिका आयुक्तांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ७ : रेन वॉटर हार्वेस्‍टिंग करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त करांमध्ये १० टक्के सवलत दिली जात होती. मात्र, त्याची मुदत संपल्यामुळे सवलत देण्यास महापालिकेने बंद केले आहे. भूजल पातळीत वाढ होण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्‍टिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे या संदर्भातील मिळकतधारकांना सवलत देण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
मिळकतधारकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी मालमत्ता करातील संयुक्त करामध्ये १० टक्के सवलत देण्याची मागणी तत्कालीन पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यास अनुसरून इचलकरंजी नगरपालिकेने ठराव करून शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावास तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून मान्यता आणली होती. तथापि, नगरपालिकेने केलेल्या ठरावांमध्ये ही सवलत चार वर्षे ठेवावी, असे नमूद केले होते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात ही सवलत इचलकरंजी महापालिकेने बंद केली आहे.
गेली अनेक वर्षे इचलकरंजी शहरास तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील एकूणच पाणी पातळी खालावलेली आहे. या उन्हाळ्यात तर अनेक कूपनलिकांचे पाणी गेले आहे. त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. इचलकरंजी महापालिकेने संयुक्त करात १० टक्के सवलत दिल्याने अनेक मिळकतधारक रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य देत होते. आता मात्र ही सवलत बंद केल्यामुळे या सामाजिक उपक्रमांवर गंडातर येणार आहे. त्यामुळे पूर्ववत १० टक्के सवलत देण्यासाठी प्रशासकीय ठराव करावा, अशी मागणी बावचकर यांनी निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchgani Gas Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’;हॉटेलमध्ये पेटल्या चुली; पर्यटकांना सेवा देतानाही मोठी कसरत

Nagpur News: इम्प्रेस मॉलवरून उडी घेत विद्यार्थ्याने संपवले जीवन; शनिवारपासून होता बेपत्ता, विषही केले प्राशन

Ramwadi–Wagholi Metro: रामवाडी - वाघोली मेट्रो मार्ग, सरकारी विभागांची संयुक्त पाहणी, अडचणी व उपाययोजना बाबत चर्चा, ३ वर्षात प्रकल्प पूर्ण होणार

निवडणूक जाहीर होण्याआधी ममतांची 'खेळी', आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी केली मोठी घोषणा

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT