कोल्हापूर

पल्लवी कोरगावकर व्याख्यानमालेस निधी

CD

88703
कोल्हापूर ः उद्योजिका पल्लवी कोरगावकर यांनी कै. प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेसाठी एक लाख रुपयांचा धनादेश कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. शेजारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

प्रभाकरपंत कोरगावकर स्मृती
व्याख्यानमालेसाठी लाखाचा धनादेश

पल्लवी कोरगावकरांकडून विद्यापीठास सुपूर्द

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः शिवाजी विद्यापीठाच्या कै. प्रभाकरपंत कोरगावकर स्मृती व्याख्यानमालेसाठी कोरगावकर उद्योग समूहाच्या प्रमुख पल्लवी कोरगावकर यांनी एक लाख रुपयांच्या वाढीव रकमेचा धनादेश कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. येथील गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्थेने १९८९ मध्ये शिवाजी विद्यापीठास २५ हजार रुपयांची देणगी दिली होती. त्या देणगीमधून ‘कै. प्रभाकरपंत कोरगावकर स्मृती व्याख्यानमाला’ विद्यापीठात सुरू झाली. या व्याख्यानमालेंतर्गत ज्येष्ठ विचारवंत य. दि. फडके, प्रा. ग. प्र. प्रधान, प्रा. राम शेवाळकर, मेधा पाटकर, माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार जगन फडणीस, माधव गडकरी, अशोक जैन, प्रा. एन. डी. पाटील, अविनाश धर्माधिकारी, शाम मानव, बाळासाहेब भारदे, मधू दंडवते, डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रकाश बाळ, अण्णा हजारे, डॉ. अरुण निगवेकर, डॉ. अनिल अवचट यांची व्याख्याने झाली. काळानुरूप बँकांच्या व्याजदराचे घटलेले दर आणि व्याख्यानमालेवरील वाढता खर्च यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन कोरगावकर यांनी व्याख्यानमाला सुरळीत सुरू राहण्यासाठी वाढीव निधी देण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी नुकतीच कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एक लाख रुपयांच्या वाढीव निधीचा धनादेश सुपूर्द केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT