कोल्हापूर

जिल्हा परिषद

CD

गर्भवतींना बाळंतपणापूर्वी रुग्णालयात दाखल करा
आरोग्य विभागाच्या सूचना; संभाव्य पूरस्थिती असलेल्या गावांबाबत खबरदारी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूरस्थिती असलेल्या गावातील गरोदर महिलांना त्यांच्या बाळंतपणापूर्वी दहा दिवस अगोदर रुग्णालयात दाखल करण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हा आरोग्य विभागाने दिल्या आहेत. प्रसूती वेदनेच्या काळात महिलांना धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागू नये, यासाठी खबरदारी घेतली आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी दिली.
ग्रामीण दुर्गम भागात भूस्खलन, पूर व महापुराची समस्या उद्‍भवते तेव्हा गरोदर मातांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाणे मुश्कील होते. नावेतून, तराफ्यावरून किंवा पाळणा करून गर्भवतींना रुग्णालयात पोहोचविले जाते. त्यासाठी दूरच्या अंतराची पायपीट करावी लागते. पाऊस, नद्या-नाल्यांना आलेला पूर, जोरदार वारे यामुळे तीन ते दहा किलो मीटर अंतराचा प्रवास करून गरोदर मातांना दवाखान्यात नेणे मुश्कील होते. यातून गर्भवती व बाळाच्या प्रकृतीस धोका संभवतो. हीच बाब विचारात घेऊन यंदा आरोग्य विभागाने ज्या भागात पूर येतो किंवा नदीकाठची पूरग्रस्त गावे आहेत, तेथील गर्भवती महिलांची नावे, मोबाईल क्रमांक, जिल्हा आरोग्य विभागाने संकलित केली आहेत. ज्या महिलांची प्रसूती पावसाळ्यातील चार महिन्यांत केव्हाही होऊ शकते, अशा महिलांना संभाव्य बाळंतपणाची तारीख विचारात घेऊन त्या तारखेपूर्वी दहा दिवस अगोदर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. त्यासाठी आशा कर्मचारी, आरोग्य सेवकांनी घरोघरी पाहणी करून तशा सूचना संबंधित महिला व नातेवाइकांना दिल्या आहेत. पावसाळ्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियुक्तीचे मुख्यालय सोडू नये, असे आदेश देण्‍यात आले आहेत.

चौकट
आरोग्य विभाग सज्ज
तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी ट्रान्झीटक पथके-२६८
भूस्स्खलन होणाऱ्या भागात वैद्यकीय पथके-८८
पूर भागातील छावण्यात वैद्यकीय सेवेसाठी पथके-१२४
१०२ जननी सुरक्षा योजना व ग्रामीण आरोग्य अभियानच्या १०८ रुग्णवाहिका सज्ज

कोट
पूर, महापुराच्या स्थितीत नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, रुग्णांवर गरजेनुसार उपचारासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. अशा अटीतटीच्या काळात आरोग्य पथकांच्या सूचनांचे पालन करून ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
-एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT