कोल्हापूर

घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस ; लाखाचा मुद्देमाल जप्त

CD

88730
...
घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस
शाहूपुरी पोलिसांकडून लाखाचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर, ता. ७ : कदमवाडी, विचारेमाळ परिसरात एप्रिल महिन्यात घडलेल्या चार घरफोडींच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले. राजर्षी शाहू कॉलेजच्या प्राचार्यांच्या निवासस्थानी झालेली चोरी, तसेच शासकीय अंडी उबवणी केंद्रातील साहित्य चोरीचा यामध्ये समावेश आहे. संशयित सद्दाम अस्लम पटवेगार (वय ३३, रा. विचारेमाळ, सदरबाजार) याला अटक करून चोरीतील ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
संशयित पटवेगार हा महावीर गार्डन परिसरात आल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली होती. याठिकाणी सापळा रचून संशयिताला पकडले. त्याला पोलिस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता साथीदार शहनाज ऊर्फ सैजान समीर शेख (वय ३५) व राहुल मनोज कोकाटे (२५, दोघे रा. विचारेमाळ) यांच्या मदतीने चोऱ्या केल्याची कबुली दिली.
कदमवाडी परिसरात २० एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत चार ठिकाणी घरफोडीचे प्रकार घडले होते. यामध्ये राजर्षी शाहू कॉलेजचे प्राचार्य लक्ष्मण कदम यांच्या निवासस्थानातून त्यांचे २५ ड्रेस, गॅस सिलिंडर, फॅन, इन्व्हर्टर असे साहित्य चोरीस गेले होते. तर मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातून दोन संगणक, प्रिंटर, टेबल फॅन, टीव्ही, लॅपटॉप असे साहित्य चोरून नेण्यात आले होते. पोलिसांनी चोरट्यांकडून तीन जनरेटर, संगणक, मोटारसायकल असे ९३ हजारांचे साहित्य जप्त केले. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक विशाल मुळे, संदीप जाधव, मिलिंद बांगर, संदीप बेंद्रे, शुभम संकपाळ यांनी कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT