कोल्हापूर

गोकूळ- म्हैशींसाठी अमेरिकेकडून निधी मिळणार

CD

म्हशींचे दूध वाढविण्यासाठी
दीड कोटींचे अनुदान मिळणार

‘गोकुळ’चे अध्यक्ष डोंगळे : दोनशे गावांतील म्हशींतून मिळणार फायदा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ८ : जिल्ह्यातील म्हशींचे दूध वाढविण्यासह प्रजनन वाढवणे, वैरण बॅंक तयार करण्यासह अन्य सुविधांसाठी थेट अमेरिकेतील संस्थेच्या सहकार्यातून दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत. यातून जिल्ह्यातील किमान २०० गावांतील १५०० म्हशींना फायदा होणार आहे. या प्रकल्पामध्ये दूध उत्पादकांनी हिरीरीने सहभागी होऊन म्हैस दूधपालन व्यवसाय निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले.
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) व भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फौंडेशन (बायफ), उरळीकांचन यांच्या वतीने म्हैशींचे दूध वाढविण्यासाठी त्यांच्या पालन पोषणासंदर्भात प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये दुग्ध व्यवसायातील आव्हाने, म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी व जनावरांचे प्रजनन, आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहाराची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर असेल. वैरण बँकेचे बळकटीकरण करणे व याद्वारे लहान दुग्ध व्यवसाय शाश्वत करून उत्पादकता वाढवणे या उद्देशाने जिल्ह्यामध्ये दोन प्रकल्प राबवले जातील. प्रकल्पामध्ये प्राथमिक स्तरावर जिल्ह्यातील किमान २०० गावांतील १५०० म्हशींचा समावेश केला जाईल. प्रकल्पासाठी इन्व्हान्मेंटल डिफेन्स फंड अमेरिका यांच्याकडून १ कोटी ४६ लाखांचे अनुदान मिळेल. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी), आनंद व नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट (एनडीआरआय) कर्नाळ (हरियाना) यांचे तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन मिळणार असल्याचेही अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT