कोल्हापूर

कळंबा कारागृहातील खूनप्रकरणी पाच संशयित ताब्यात

CD

88744
...

कळंबा कारागृह खूनप्रकरणी
पाच संशयित ताब्यात
न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातून ताबा ः खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना ऊर्फ मोहम्मद अलीखान ऊर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता (वय ५९) याचा दोन मे रोजी कळंबा कारागृहात डोके ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी कारागृहातील पाच बंद्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या परवानगीने पाचही संशयितांचा जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी ताबा घेतला. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले. संशयितांच्या चौकशीत खुनाचे नेमके कारण उघड होण्याची शक्यता आहे.
अटक केलेल्यांमध्ये मोकातील न्यायाधीन बंदी प्रतीक ऊर्फ पिल्या सुरेश पाटील (रा. इस्लामपूर, सांगली), संदीप शंकर चव्हाण (रा. मोरे कॉलनी जत, सांगली), ऋतुराज विनायक इनामदार (रा. विक्रमनगर, कोल्हापूर), तर खुनाच्या गुन्ह्यातील न्यायाधीन बंदी दीपक नेताजी खोत (रा. कुपवाड, मिरज), सौरभ विकास सिद्ध (वाळवा, जि. सांगली) याचा समावेश आहे. जुना राजवाडा पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रियेने शुक्रवारी पाच जणांचा कारागृहातून ताबा घेतला.
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी ठरलेला मुन्ना खान आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. मुंबई सेंट्रल जेलमधून २०१३ मध्ये याला कळंबा कारागृहात आणले होते. दोन मे रोजी मुन्ना सकाळी साडेसातच्या सुमारास कारागृहातील हौदावर अंघोळीला आला असताना प्रतीक पाटील, बबलू चव्हाण, सौरभ सिद्ध, ऋतुराज इनामदार, दीपक खोत या पाच जणांनी ड्रेनेजच्‍या सिमेंटच्‍या व लोखंडी झाकणाने डोक्यात, पाठीत, कपाळावर, हातापायावर घाव घातल्याने मुन्ना जागीच ठार झाला होता. पाचही जणांना तपासकामी जुना राजवाडा पोलिसांना ताब्यात घेतले असून पोलिस कोठडीत चौकशीनंतर खुनाचे नेमके कारण समोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT