कोल्हापूर

पान एक-स्टेअरिंग रॉड तुटून एसटीला अपघात

CD

88748
श्रावण ः येथे शुक्रवारी अपघातग्रस्त झालेली एसटी बस.

स्टेअरिंग रॉड तुटून
बस झाडावर आदळली
श्रावणमध्ये चालकासह दहा जखमी

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ७ ः स्टेअरिंग रॉड तुटल्याने एसटी बसची झाडाला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. ही घटना आचरा-कणकवली मार्गावरील श्रावण बाजारपेठ येथे आज दुपारी एकला घडली. एसटीतील अन्य प्रवासीही किरकोळ जखमी झाले. चालक ए. एम. बुटाले (वय ४२, रा. घोडगे) यांच्यासह अन्य दहा प्रवासी जखमी झाले. धडकेत एसटीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी ः आचरा-कणकवली एसटी आज साडेबाराला आचरा येथून निघाली. बसमध्ये २५ प्रवासी व काही छोटी मुले होती. एसटी श्रावण येथे प्राथमिक शाळेजवळ आली असता रस्ता सोडून गटारातून आदळत आंबा व फणसाच्या झाडावर जोरदार आदळली. मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. चालक बुटाले स्टेअरिंगमध्ये अडकून पडले. त्यांना व अन्य जखमी प्रवाशांना श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, माजी सरपंच प्रशांत परब, पोलिस पाटील संजय दळवी, संतोष बाईत, स्वप्नील पुजारे, मंगेश यादव, भाऊ राऊत, ओंकार घाडी, गणेश बाईत यांनी मदत केली. जखमींना खासगी वाहनांमधून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. चालक बुटाले यांना कणकवली येथे हलविण्यात आले. अपघाताची नोंद उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात करण्यात आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT