कोल्हापूर

पोलिसवृत्त

CD

मोटारीची काच फोडून
लॅपटॉप, मोबाईलची चोरी
कोल्हापूर : ताराबाई पार्कातील मॉलबाहेर पार्क केलेल्या मोटारीची काच फोडून रोख रकमेसह किमती साहित्य चोरट्यांनी पळविले. विनोदकुमार आप्पासाहेब कांबळे (वय ५०, रा. शाहूवाडी) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली. सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. चोरट्याने रोख २५ हजार रुपये, लॅपटॉप, मोबाईल असे साहित्य चोरून नेले.
...
हॉस्पिटलमधून
मोबाईल चोरीस
कोल्हापूर ः न्यू शाहूपुरीतील हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून मोबाईल चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला. विजय विनोद गावकर (वय ३६, रा. शिवाजी पेठ) यांनी याबाबत फिर्याद दिली. याप्रकरणी संशयित जितेंद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
...
सर्पदंशाने वृद्धाचा मृत्यू
कोल्हापूर ः सर्पदंशाने उपचारास दाखल झालेले पांडुरंग शंकर सुतार (वय ७०, रा. शिरगाव, शाहूवाडी) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. ७) राहत्या घरानजीक त्यांना सर्पदंश झाल्याने मलकापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने सीपीआरमध्ये आणले असता उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...
कुत्र्याच्या चाव्यातील
तरुणाचा मृत्यू
कोल्हापूर ः खानापूर (ता. सांगली) येथे तीन महिन्यांपूर्वी कुत्र्याच्या चाव्याने जखमी झालेले असीफ अदाम मुल्ला (वय ३८) यांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. राहत्या गावी त्यांना कुत्रे चावल्यानंतर वेळेत रेबीज इंजेक्शनचा कोर्स पूर्ण न झाल्याने त्याला त्रास सुरू होता. पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले असता शनिवारी मृत्यू झाल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली.
...
बालक भाजून जखमी
कोल्हापूर ः तोल जाऊन चुलीत पडल्याने शिवम मिटके (वय १, रा. भुदरगड) हा चिमुकला जखमी झाला. शनिवारी दुपारी राहत्या घरी हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT