कोल्हापूर

आजरा ः टस्कराचा वाटंगीत धुमाकूळ

CD

88919, 88920
वाटंगी (ता. आजरा) ः टस्कराने फेकलेला छकडा. दुसऱ्या छायाचित्रात ढकलून टाकलेल्या दुचाकी.
...
टस्कराने केले बैलगाडीचे खेळणे
वाटंगीमध्ये टस्कराचा धुमाकूळ ः दुचाकीचेही नुकसान
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ८ ः वाटंगी (ता. आजरा) येथे टस्काराने चांगलाच धुमाकूळ घातला. त्याने बैलगाडी सोंडेने उचलून दूरवर फेकून दिली. घराच्या दारात लावलेल्या दुचाकी ढकलून नुकसान केले. यामुळे वाटंगी गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चाळोबा जंगल परिसरात वावरणाऱ्या टस्कराने तालुक्याच्या पूर्व भागात मोर्चा वळवला आहे. वाटंगी व चितळे परिसरात टस्कर वावरत आहे. आज शनिवारी पहाटेच्या सुमाराला टस्कर वाटंगी-मोरेवाडी मार्गावर आला. तो पुंडलिक नाईक यांच्या घराजवळ गेला. तेथे काही वेळ फेरफटका मारल्यावर त्याने दाराजवळ ठेवलेली बैलगाडी सोंडेने उचलली व दूरवर फेकून दिली. त्याचबरोबर त्याने दारात लावलेल्या मोटारसायकली सोंडेने व पायाने ढकलून दिल्या. त्याने परिसरात धुमाकूळ घातला. पहाटे परत तो मोरेवाडीच्या जंगल परिसरात गेला आहे. त्याच्या पायाचे ठसे मिळालेले आहेत. पुंडलिक नाईक यांच्या बैलगाडीसह दुचाकी व संभाजी देसाई यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. आजरा तालुक्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. शेतकरीवर्ग शेतीच्या कामात व्यस्त आहेत. ऐन खरीप हंगामात टस्कर वाटंगी परिसरात येऊन धुमाकूळ घालत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT