कोल्हापूर

तोतया कस्टम अधिकाऱ्याने समरजीत घाटगेंच्या पत्नीकडून २० लाख उकळले

CD

तोतया कस्टम, सीबीआय अधिकाऱ्यांनी
महिलेला २० लाख रुपयांना फसविले;
परदेशातील पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याची घातली भीती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : तुमच्याकडून परदेशात पाठविण्यात येणाऱ्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याची भीती दाखवत तोतया कस्टम अधिकारी व सीबीआय अधिकाऱ्याने एका महिलेकडून २० लाख रुपये उकळले. संबंधित महिलेशी फोनवरून बोलणाऱ्या अनिल यादव व अजित नावाच्या दोघांनी २ ते ५ जून दरम्यान वेळोवेळी ही रक्कम बॅंक खात्यातून वळवून घेतली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली. सायबर पोलिसही याचा समांतर तपास करीत आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः नागाळा पार्क येथील सौ. नवोदिता घाटगे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांना दोन जून रोजी एक दूरध्वनी आला. ‘तुम्ही मलेशिया येथे पाठविण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये एम.डी. नावाचे ड्रग्ज सापडले आहे. तसेच तुमच्या नावे अनेक पासपोर्ट व एटीएम आहेत’ असे सांगून समोरील व्यक्तीने तो कस्टम अधिकारी असल्याचे सांगितले. यानंतर पुन्हा सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगून दुसऱ्या व्यक्तीने तुम्ही केलेला गुन्हा अत्यंत गंभीर असून, हे प्रकरण मिटविण्यासाठी २० लाख रुपये द्यावे लागतील, असे बजावले.
नवोदिता घाटगे यांनी घाबरलेल्या अवस्थेत त्यांच्या बॅंक खात्यांची माहिती दिली. तोतया अधिकाऱ्यांनी घाटगे यांच्या बचत खात्यातून २० लाखांची रक्कम जबरदस्तीने वर्ग करून घेतली. ही रक्कम एम. एम. एंटरप्रायजेस, आरव प्लाझा, काला टोल बाजार असा पत्ता असलेल्या बॅंकांच्या खात्यावर स्वीकारण्यात आली.
शाहूपुरी पोलिसांनी संशयित अनिल यादव, अजित (पूर्ण नाव समजू शकलेले नाही) या दोघांवर गुन्हा दाखल केला. तसेच घाटगे यांना आलेले मोबाईल क्रमांक, बॅंक खात्यांचा तपशील तातडीने सायबर पोलिसांकडे देण्यात आले आहेत. सायबर पोलिसही या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT