कोल्हापूर

इचलकरंजीत बुधवारी ‘मिशन ई- अॅडमिशन’

CD

इचलकरंजीत बुधवारी
‘मिशन ई-अॅडमिशन’
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ९ : येथील पालक-शिक्षक संघातर्फे इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी ‘मिशन ई-अॅडमिशन’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहामध्ये बुधवारी (ता. १२) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हा उपक्रम होणार आहे. यामध्ये १४ इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा सहभाग राहणार आहे.
दुपारच्या सत्रात प्रवेश प्रक्रिया कशी असेल, इंजिनिअरिंग म्हणजे काय, विविध इंजिनिअरिंग महाविद्यालयांची माहिती, उपलब्ध अभ्यासक्रम यांची माहिती दिली जाणार आहे. प्रा. डॉ. अजित पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रवेशप्रक्रियेतील नोंदणीपासून, फी स्ट्रक्चर, फी सवलती, कॉलेजेसचे इनटेक आणि कट ऑफविषयी प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता माहिती देणार आहेत. प्रवेशासाठी महत्त्वाची माहिती आणि अनेक कॉलेजेस आणि शाखांची मागील वर्षाची ‘कट ऑफ’ असलेली पुस्तिका विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. इचलकरंजी परिसरातील १४ इंजिनिअरिंग कॉलेजेस सहभागी होऊन त्यांच्याविषयी माहिती देणार आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. एच. ए. पाटील, प्रवीण कुरडे यांनी पालक-शिक्षक संघातर्फे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT