कोल्हापूर

श्रेयस-अर्थव, गुफा गार्डियन्स उपांत्य फेरीत

CD

88986
गडहिंग्लज : श्रेयस अर्थव वॉरियर्स विरुद्ध युनायटेड रायझिंग स्टार्स सामन्यातील चुरशीचा क्षण. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचिसेवा)
....
श्रेयस-अर्थव, गुफा गार्डियन्स उपांत्य फेरीत

शिवराज- युनायटेड डेव्हलपमेंट लीग : इफा लायन्स, युनायटेड रायझिंगही पात्र

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : शिवराज-युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगच्या तिसऱ्या दिवशी श्रेयस-अर्थव वॉरियर्स, गुफा गार्डियन्स संघांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. सरस गुणाच्या जोरावर इफा लायन्स आणि युनायटेड रायझिंग स्टार्सही पात्र ठरले. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे ही स्पर्धा एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर सुररू आहे.
रंगतदार सामन्यात श्रेयस-अर्थव वॉरियर्सने युनायटेड रायझिंग स्टार्सला टायब्रेकरमध्ये ६-५ असे नमविले. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. पूर्वार्धात युनायटेड रायझिंगच्या साई मिरजकरने घेतलेली आघाडी श्रेयस-अर्थवच्या आलोक पाटीलने गोल करून बरोबरी साधली. टायब्रेकरमध्ये श्रेयस-अर्थवच्या प्रसाद पोवार, अनुप बणगे, पार्थ म्हेत्री, अवधूत चव्हाण, तर रायझिंगच्या यश पाटील, हर्ष कुलकर्णी, अभिषेक कोरवी, साई मिरजकर यांनी गोल केल्याने कोंडी ४-४ अशी कायम राहिली. सडनडेथमध्ये सुजल कांबळेचा फटका गोलखांबाजवळून बाहेर गेल्याने मिळालेल्या सुवर्णसंधीवर पवन गुंठेने गोल करून सहकाऱ्यांना जल्लोषाची संधी दिली.
गुफा गार्डियन्सने दादा जीएम चॅलेंजर्सला ३-१ असे हरवून आगेकूच केली. तिसऱ्या मिनिटाला प्रशांत सलवादेचा मारलेला फटका गुफाचा गोलरक्षक सर्वेश मोरे गाफील राहिल्याने गोलात शिरल्याने दादा जीएमला अनपेक्षित आघाडी मिळाली; पण पाचव्या मिनिटाला गुफाचा कर्णधार आर्यन दळवीने गोल करून प्रतिस्पर्ध्याच्या उत्साहाला लगाम घातला. दहाव्या मिनिटाला विद्याधर धबालेने वर्धन कांबळेच्या सुरेख पासवर गोल करून २-१ अशी आघाडी मिळवली. मध्यंतरास एक मिनिट असताना विद्याधरने आपला दुसरा आणि गुफाचा तिसरा गोल करून पकड घट्ट केली. उत्तरार्धात दादा जीएमच्या श्रवण पाटील, सुमित कांबळेचे उत्कृष्ट फटके गोलरक्षक सर्वेशने अडवून विजय साकारला. आजच्या सामन्यातील सामनावीर म्हणून सश्रुत सासने, मांतेश सुळकुडे तर लढवय्या म्हणून सुजल कांबळे, रितेश मोरे यांचा क्रीडा साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
.....

चौकट...
उपात्यं फेरीचे सामने
गुफा गार्डियन्स वि. युनायटेड रायझिंग स्टार्स ः सकाळी. ८ वा.
श्रेयस-अर्थव वॉरियर्स वि. इफा लायन्स ः सकाळी ९ वा.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

आजचे राशिभविष्य - 25 मार्च 2026

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

SCROLL FOR NEXT