कोल्हापूर

बनावट क्रमांक लावून विकलेल्या आणखी तीन टेम्पो ट्रॅव्हलर जप्त

CD

नंबर प्लेट बदलून विकलेल्या
आणखी तीन टेम्पो ट्रॅव्हलर जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाई

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : टेम्पो ट्रॅव्हलरचे चेस नंबर आणि नंबर प्लेट बदलून ती रस्त्यावर फिरविणाऱ्या, तसेच त्यांची बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी यापूर्वीच पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून आणखी तीन टेम्पो ट्रॅव्हलर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त केल्या आहेत. या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तपासणी न करताच फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येत आहे. ती कोणी दिली? याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. ती मिळाल्यानंतर लवकरच याचा उलगडा होईल, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांनी दिली.
टेम्पो ट्रॅव्हलरना दरवर्षी एक लाख २० हजार रुपये कर भरावा लागतो. तसेच दरवर्षी नोंदणी नूतनीकरण करून फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे लागते. यासाठी होणारा खर्च टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका एजंटसह काही टेम्पो ट्रॅव्हलर मालक आणि मेकॅनिकलनी बंद अवस्थेतील टेम्पो ट्रॅव्हलरची नंबरप्लेट आणि चेस नंबर वापरून कर बुडवत शासनाची फसवणूक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हा प्रकार उघडकीस आणून सहा ट्रॅव्हलर जप्त केल्या होत्या. या गुन्ह्याचा कसून तपास सुरू असताना आणखी तीन ट्रॅव्हलर पोलिसांनी जप्त केल्या. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलरचे नूतनीकरण करताना वाहनाचा इंजिन नंबर, चेस नंबर आणि नोंदणी नंबरची तपासणी करणे बंधनकारक असते; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अधिकाऱ्यांनी वाहनांना फिटनेस सर्टिफेकिट दिले आहे. या वाहनांना सर्टिफिकेट कोणी दिले, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, असे तपास अधिकारी मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT