कोल्हापूर

राष्ट्रवादी शरद पवार गट

CD

फोटो 89274

चार विधानसभा मतदारसंघांत
झेंडा फडकणार ः व्ही. बी. पाटील

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे वर्धापन दिन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः जिल्हा ग्रामीण आणि कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवाजी स्टेडियम येथील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये पक्षाचा वर्धापन दिन झाला. यावेळी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत पक्षाचा झेंडा नक्की फडकणार आहे, असा विश्वास जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी व्यक्त केला.
पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीकडे असून, या मतदारसंघांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार जो उमेदवार देतील तो निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कागल, चंदगड आणि राधानगरी-भुदरगड हे तिन्ही मतदारसंघ पूर्वीपासून पक्षाकडे आहेत. चौथा मतदारसंघही निश्चितपणाने पक्षाचाच असेल आणि तो कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी, शिरोळ, हातकंणगले या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी एक असेल.’
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या विजयाबद्दल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विजय महायुतीचा नसून पैशांचा आहे. लवकरच जिल्ह्याच्या दौऱ्याला प्रारंभ करणार असल्याचेही ते म्हणाले.
कार्याध्यक्ष अनिल घाटगे, जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी माने-मांगुरकर, सरचिटणीस सुनील देसाई, माजी सरचिटणीस चंद्रकांत वाकळे, रामराजे कुपेकर, करवीर तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, निरंजन कदम, हिदायत मणेर, मुसाबाई कुलकर्णी आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष, माजी महापौर आर. के. पोवार यांनी स्वागत केले. सेवा दलाचे शहराध्यक्ष महादेव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ; २ लाखांचे थकीत पीककर्जाचीच माफी, अशी नसणार अट; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ, वाचा...

Quick & Easy Morning Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने ; फक्त 10 मिनिटांत बनवा 'मल्टी व्हिटामिन भेळ'

Panchang Today 30 Marach 2026 : आजचा दिवस शुभ; मुहूर्त, राहू काळ आणि उपाय जाणून घ्या

गुन्हेगारांचे धाबे दणाणले! सोलापूर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक; जुगार अड्डे, अवैध वाळू वाहतूक, ऑर्केस्ट्रा बार, अवैध दारुनिर्मिती, विक्रीवर असणार लक्ष

MI vs KKR Live : रायन रिकल्टनच्या ८१ धावा, रोहित शर्माच्या ७८... तरीही प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार तिसऱ्यालाच; जाणून घ्या का?

SCROLL FOR NEXT