कोल्हापूर

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शाहू मानेचा सुवर्णासह कांस्य वेध

CD

89287
शाहू माने
...
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत
शाहू मानेचा सुवर्णासह कांस्य वेध

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः भोपाळ येथे सुरू असलेल्या २२ व्या कुमार सुरेंद्र सिंग राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने याने दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण, तर ५० मीटर प्रोन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. तो या प्रकारात प्रथमच सहभागी झाला होता.
शाहूने दहा मीटर एअर रायफल प्रकारात प्रतिस्पर्धी खेळाडूवर ६३१.३ गुणांचा वेध घेऊन अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत त्याने प्रतिस्पर्ध्यावर तीन गुणांची आघाडी घेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. प्रथमच त्याने ५० मीटर प्रोन प्रकारात ५७२ गुणांचा वेध घेत कांस्य पदकाला गवसणी घातली. पन्नास मीटर थ्री पोझिशनमध्ये त्याने ५७२ गुणांचा वेध घेतला. मात्र, त्याला २९ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सध्या तो ऑलिंपियन गगन नारंग यांच्या गन ॲन्ड ग्लोरी अकादमीत सराव करीत आहे, तर मध्य रेल्वेच्या पुणे विभागात कार्यरत आहे. यासह तो शिक्षणानिमित्त के.आय.टी. कॉलेजमध्ये मेकॅनिकल विभागात तृतीय वर्षात शिकत आहे. त्याला मंत्री चंद्रकांत पाटील, अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजीद हुदली, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. मोहन वनरोटी, डॉ. एम.एम. मुजुमदार, डॉ. उदय भापकर यांचे प्रोत्साहन लाभले.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT