कोल्हापूर

कर्णकर्कश बुलेट सायलेन्सरवर कारवाई

CD

शहरात ९० कर्णकर्कश बुलेट सायलेन्सर जप्त
शहर वाहतूक पोलिस शाखेची कारवाई; दारू पिऊन दुचाकी चालविणाऱ्यांवही बडगा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : शहरात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या जवळपास ९० कर्णकर्कश बुलेट सायलेन्सर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे ९० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर दारू पिऊन दुचाकी चालविणाऱ्या ६० जणांवर कारवाई करत खटले दाखल करण्यात आले. शहर वाहतूक पोलिस शाखेकडून तीन दिवसांत मोहीम राबवून धडक कारवाई केली आहे.
पोलिसांकडून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांसह कर्णकर्कश बुलेट सायलेन्सरवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. यासाठी पोलिस उपननिरीक्षक डॉ. मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात सहा पथके स्थापन केली आहेत. प्रत्येक पथकात दोन जणांचा समावेश आहे. या पथकांकडून शहरात सर्वत्र कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील ९० बुलेटचालकांवर कारवाई करून कर्णकर्कश सायलेन्सर जप्त केले. त्यांच्याकडून प्रत्येकी १ हजार रुपये दंड वसूल केला. ही कारवाई इथून पुढेही काही दिवस सुरू राहणार आहे.

कोट
दारू पिऊन वाहन चालविणे हे अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यांच्याबरोबरच दुसऱ्याच्या जीवाला धोकादायक आहे. त्याचबरोबर कर्णकर्कश सायलेन्सरच्या आवाजाने मोठ्या प्रमाणत ध्वनिप्रदूषण होत आहे. या पार्श्‍वभूमीव मोहीम सुरू केली आहे.
-डॉ. मनोज पाटील, उपनिरीक्षक, शहर पोलिस वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

SCROLL FOR NEXT