कोल्हापूर

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी युवकास तीन वर्षे सक्तमजुरी

CD

अल्पवयीन मुलीवर अत्याचार;
एकाला तीन वर्षे सक्तमजुरी

कोल्हापूर, ता. १० : दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विधी संघर्षग्रस्त बालकास जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) पी. एफ. सय्यद यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲड. अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले. दंडाची रक्कम पीडितेस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही दिले आहेत.
फिर्यादीचे पंक्चर व सर्व्हिस सेंटर आहे. येथे चार स्वमग्न मुले कामास आहेत. येथे एक विधी संघर्षग्रस्त बालक त्याच्या वडिलाच्या सांगण्यावरून शिकण्यासाठी जात होता. १ जून २०२२ ला दुपारी चार वाजता फिर्यादी हे वाहनाच्या चाकाचे पंक्चर काढत होते. तेव्हा संशयित विधी संघर्षग्रस्त बालक दिसेनासा झाला. त्यावेळी तो पाठीमागील पडक्या खोलीत अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करीत असल्याचे फिर्यादीने पाहिले. त्यांनी तत्काळ मुलीस त्याच्या तावडीतून सोडविले. त्यावेळी संशयित तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी फिर्यादी यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तत्कालीन परिविक्षाधिन पोलिस उपनिरीक्षक पी. एस. वाकळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

Nashik Municipal Corporation : नाशिककरांनो सावधान! महापालिकेच्या सर्वेक्षणात दीड लाखांहून अधिक नळजोडण्या आढळल्या नियमबाह्य

Jim Corbett: जिम कॉर्बेटचा हाऊसफुल्ल! बुकिंग उघडताच काही मिनिटांत ४१ खोल्या बुक; करावी लागतेय वर्षभर प्रतीक्षा!

Ratnagiri Farmer : जिल्ह्यात सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका; विचित्र; वातावरण, कमाल तापमान ३८ अंशांवर, बागायतदार चिंतेत

SCROLL FOR NEXT