कोल्हापूर

पोलीस वृत्त

CD

नागवेत पैशासाठी वृद्धाला
मुलगा, नातवाकडून मारहाण

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १० ः नागवे (ता. चंदगड) येथील सुभाष नारायण पाटील (वय ७०) यांना त्यांचा मुलगा मारुती सुभाष पाटील, नातू महेश व दोन अनोळखी व्यक्तींनी लाकडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. गुरुवारी (ता. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. सुभाष पाटील हे घरासमोर बसले असताना त्यांचा मुलगा संशयित मारुती, नातू महेश व अन्य दोघे तिथे आले. मारुती याने आपल्याला पैशाची गरज आहे असे म्हणून पैशाची मागणी केली. त्यांनी आपल्याकडे पैसे नाहीत, असे म्हटल्यावर शिवीगाळ करू लागला. घरासमोर जळणासाठी ठेवलेले लाकूड घेऊन मारहाण करू लागला म्हणून सुभाष यांनी घरात जाऊन दार बंद केल्यावर लाथा-बुक्या मारून व कोयत्याने दरवाजावर वार करून दार मोडले. आत घुसून लाकडाने त्यांना मारहाण केली. यात त्यांचा डावा हात दुखावला. नातू महेश याने त्यांच्या डाव्या पायाच्या पिंडरीवर कोयत्याने वार करुरून जखमी केले. अन्य दोघा अनोळखींनी लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याचे सुभाष यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

SCROLL FOR NEXT