कोल्हापूर

पोलिसवृत्त

CD

अंबाबाई मंदिरात
मोबाईल चोरणाऱ्या
महिलेस अटक

कोल्हापूर ः अंबाबाई मंदिरात भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली. इंदू किस्मत सकट (वय ६०, रा. लिंबेवाडी, पन्हाळा) असे संशयित महिलेचे नाव आहे. फिर्यादी सुनंदा काशीद (रा. फुलेवाडी, रिंगरोड) यांनी याबाबत जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास मंदिरात हा प्रकार घडला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिलेला ताब्यात घेतले.
.................
विषारी द्रव
प्यायल्याने
वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर ः विषारी द्रव प्यायल्याने प्रकृती चिंताजनक बनलेले भाऊसो तुकाराम पाटील (वय ७३) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी रात्री राहत्या घरी विषारी द्रव पिल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.
.............
दुचाकी घसरून
तरुण जखमी
कोल्हापूर ः रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडी गावानजीकच्या रेडे डोहानजीक दुचाकी घसरून पडल्याने सुनील शामराव कानडे (वय ३५, रा. पाटपन्हाळा) जखमी झाले. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...............
कणेरीत
तरुणास मारहाण
कोल्हापूर ः कणेरी (ता. करवीर) येथे झालेल्या मारहाणीत प्रफुल्ल बापूसो शिंदे (वय ३१) जखमी झाले. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.
.................
राजारामपुरीत
वृद्धास मारहाण

कोल्हापूर ः राजारामपुरी सायबर चौकात झालेल्या मारहाणीत अनिल शामराव पाथरूट (वय ६०) जखमी झाले. मंगळवारी मध्यरात्री कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...........
जवाहरनगरातून
पितळी बंब चोरीस
कोल्हापूर ः जवाहरनगर परिसरातून पितळी, तांब्याचे बंब चोरीचे प्रकार समोर आले. संजय मधुकर व्हटकर (वय ५४) यांनी याबाबत राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली. चोरीस गेलेल्या दोन बंबांची किंमत १९ हजार रुपये असून, पहाटेच्या सुमारास असे प्रकार घडत आहेत.
...............
गॅलरीतून पडून
तरुणी जखमी
कोल्हापूरः शुक्रवार पेठेतील इमारतीच्या गॅलरीतून तोल जाऊन पडल्याने अक्षयानी चंद्रशेखर कुलकर्णी (वय २१) ही तरुणी जखमी झाली. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT