कोल्हापूर

पर्यावरण दिनानिमित्त एकटी संस्थेतर्फे कार्यक्रम

CD

‘अवनि’तर्फे औषधी वनस्पती निर्मिती, प्रदर्शन
कोल्हापूर : अवनि संस्थेतर्फे कचरावेचक कुटुंबातील सहा वस्त्यांमध्ये मुलांसाठी मोबाईल लायब्ररी, अभ्यासिका, बाल अधिकार मंच चालवल्या जातात. मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे म्हणून बाल अधिकार मंचच्या मुलांबरोबर दोन महिन्यांपूर्वी मुलांना पर्यावरणपूरक वस्तू, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या याबाबत कार्यशाळा घेतली होती. ५ जूनला मुलांनी प्लास्टिक संकलन उपक्रम हाती घेतला. मुलांनी औषधी वनस्पती निर्मिती आणि प्रदर्शन भरवले.
विचारेमाळ, साळोखे पार्क, राजेंद्रनगर, रेंदाळ, मुडशिंगी तसेच दोन महिन्यांपासून बाल अधिकार मंचच्या २०५ मुलांनी ओवा, कोरफड, कडीपत्ता, तुळस, गवती चहा, हळद, खाऊची पाने, पपई, पुदिना अशा ५०० रोपांची निर्मिती केली. शिवराज सोसायटी, कदमवाडी रोड येथे रोपांचे प्रदर्शन भरवले. विदुला स्वामी यांनी प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. अनुराधा भोसले यांनी प्रत्येकाने निसर्ग संवर्धनाचा वसा घेतला पाहिजे, असे आवाहन केले. जोया बेपारी, अश्‍विनी, अंकिता या मुलांनी मनोगत व्यक्त केले. वनिता कांबळे, मनिषा कांबळे, अलनिसा गनिभाई, लता धुमाळ, रेशमा चव्हण, सारिका मागाडे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT