कोल्हापूर

दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या

CD

फोटो 89494

दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या
शाळांचा परिसर फुलला; पुढील प्रवेश प्रक्रियेला मिळणार गती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना आज मिळाल्या. मूळ गुणपत्रिका हातात पडल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. या गुणपत्रिका मिळाल्याने आता अकरावी, आयटीआय आणि तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर गेल्या आठवड्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेच्या मूळ गुणपत्रिका आज विद्यार्थ्यांना दिल्या जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयातर्फे सकाळी अकरा ते दुपारी अडीच यावेळेत शाळांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, शाळेचा लागलेला एकूण निकाल आणि त्यातील विशेष प्रावीण्यप्राप्त, प्रथम श्रेणीप्राप्त विद्यार्थ्यांची माहिती असलेली पुस्तिकांचे वाटप केले आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मूळ गुणपत्रिका मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळा गाठली. त्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या. गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणपत्रिका हातात पडल्यानंतर स्मार्टफोनमध्ये एकत्रित छायाचित्र टिपत आनंद व्यक्त केला. सुटी असूनही शाळांचा परिसर विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलला. जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेचा परिसर सोडला. काही शाळांनी गुणपत्रिकेसोबत विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला, तर काहींनी दाखला देण्याची प्रक्रिया उद्या, बुधवारपासून सुरू करणार असल्याचे जाहीर केले.

चौकट
मुक्त विद्यालयासाठी शनिवारपर्यंत मुदत
काही कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यांच्यासाठी शिक्षण पूर्ण करण्याची संधी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयाच्या माध्यमातून शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या मंडळाअंतर्गत इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रवेश अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत शनिवार (ता. १५ जून) पर्यंत आहे. या विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज शुल्क आणि कागदपत्रांसह शाळांमध्ये जमा करण्याची मुदत मंगळवार (१८ जून) पर्यंत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT