कोल्हापूर

अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या सर्वाधिक संधी : डॉ. गुप्ता

CD

89473
कोल्हापूर : अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत डॉ. ए. के. गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. समोर उपस्थित विद्यार्थी.

अभियांत्रिकीत रोजगाराच्या
सर्वाधिक संधी : डॉ. गुप्ता 
‘डी. वाय. पाटील’मध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अभियांत्रिकीचा ठसा आहे. अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे ‘प्रॉब्लेम सॉल्व्हर्स’ असून, समाजासाठी सुविधा निर्माण करण्याचे महत्त्‍वाचे कार्य अभियंते करतात. अन्य कोणत्याही अभ्यासक्रमापेक्षा अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या सर्वाधिक संधी असून, अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा तितकीच महत्त्‍वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली आवड, क्षमता व संधी लक्षात घेऊन योग्य शाखा निवडावी, असे आवाहन  डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले.
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात (स्वायत्त संस्था) आयोजित ‘अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४’ या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, स्कूल ऑफ इंजनिअरिंग अॅन्‍ड मॅनेमेंटचे संचालक डॉ. अजित पाटिल, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, प्रवेश प्रक्रियाप्रमुख रवींद्र बेन्नी यांच्या प्रमुख उपस्थितीत सेमिनार झाला.
डॉ. गुप्ता म्हणाले, ‘‘अभियांत्रिकीच्या अनेक शाखा भविष्याचा वेध घेणाऱ्या आहेत. यातूनच भविष्याची नवी दालने खुली होणार आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण महागडे आहे, असा गैरसमज आहे. मात्र, या शिक्षणासाठी राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती व सवलती लागू आहेत. तसेच डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुरू आहे. सीईटीचा निकाल लवकरच लागणार असून, अभियांत्रिकीसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया पंधरा दिवसांनी सुरू होईल.’’ यावेळी कोणती शाखा निवडावी, अर्ज कसा भरावा, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कशी असेल, कोणती कागदपत्रे लागतील, सीट अलॉटमेंट याबाबत डॉ. गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. प्रा. राधिका ढणाल, प्रा. सुनंदा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT