कोल्हापूर

रस्ता बंद

CD

चप्पल लाईन रस्ता
आता कॉँक्रिटचा
वाहतूक ६० दिवस राहणार बंद; कायम खड्ड्यांमुळे निर्णय
कोल्हापूर, ता. ११ : पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करूनही रस्ता खराब होण्याचा प्रकार थांबलेला नाही. त्यामुळे महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पापाची तिकटी दरम्यानचा चप्पल लाईनचा बहुचर्चित रस्ता आता कॉँक्रिटचा केला जाणार आहे. त्यासाठी तेथील वाहतूक ६० दिवस बंद ठेवण्यात आली आहे.
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या रस्त्यावर वाहतूक तसेच पर्यटकांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर असलेल्या चप्पल दुकाने, महापालिकेचे विभागीय कार्यालय, छत्रपती शिवाजी मार्केट, शिक्षण समितीचे तसेच पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय आहे. नेहमी अवजड वाहतूक असलेल्या रस्त्यावर सतत खड्ड्यांचे साम्राज्य असायचे. कधी पॅचवर्क करूनही ते टिकत नव्हते. गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीसाठी हा रस्ता पर्यायी मार्ग आहे. त्यामुळे महापालिकेने दरवर्षी या रस्त्यावर पॅचवर्क केले जायचे. काही वर्षी तर संपूर्ण डांबरीकरणही करण्यात आले.
तरीही रस्ता खराब होतच होता. महापालिकेने काही वर्षांपासून प्रयोगही केले. त्यात प्रथम पर्यावरणपूरक साहित्य वापरून रस्ता बनवला; पण काही कालावधीतच तो खराब झाला. त्यानंतर कचऱ्यातून जमा झालेल्या प्लास्टिकचा वापर करून डांबरीकरण करण्यात आले. त्याचाही फरक पडला नाही. यानंतर आता या मुख्य रस्त्याच्या कॉँक्रिटीकरणाचे काम करायचे महापालिकेने ठरवले आहे. आजपासून १० ऑगस्टपर्यंत काम केले जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता ६० दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
-----------------
चौकट
गटारींचे नियोजन काय?
हा रस्ता खराब होण्यामागे तिथे नसलेल्या गटारी हे प्रमुख कारणीभूत आहे. त्या रस्त्यावर विविध प्रयोग केले, पॅचवर्क केले गेले; पण तिथे गटार करण्यासाठी पावले उचलली नाहीत. आताही कॉँक्रिटचा रस्ता केल्यानंतर गटार नसल्याने तेथील सांडपाण्याचा प्रश्‍न आहेच. त्यामुळे महापालिकेने गटारीचे कामही करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale: राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बरोबरच: मंत्री भरत गोगावले; माढा तालुक्यातील फळबागांची केली पाहणी!

Dilip Walse Patil: आंबेगाव तालुक्यातील ५ हजार ५८१ खाती कर्जमाफीसाठी पोर्टलवर अपलोड: दिलीप वळसे पाटील; उर्वरित खाती तातडीने अपलोड करा!

FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

रोहित शर्माने पूर्ण केलं संजू राठोडचं स्वप्न, 'हिटमॅन'सोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'लहानपणीचं स्वप्न...' Viral Video

Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

SCROLL FOR NEXT